नवी मुंबईत दहा वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद

नवी मुंबईत दहा वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद

नवी मुंबई : चालू वर्षात सप्टेंबरपर्यंत ४४१९.११ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर अजून कायम आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पावसाची माघारीची चिन्हे नाहीत. त्यामुळे शहरात झालेल्या या पावसाचे प्रमाण अजून वाढण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर आणखी कायम राहिल्यास यंदा पाऊस पाच हजार मिमीचा टप्पा पार करेल, अशी शक्यता आहे. मोरबे धरण परिसरात तर आतापर्यंत ४८९४.४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहरातील पावसाची नोंद करण्यासाठी पालिकेच्या वतीने बेलापूर, नेरूळ, वाशी, ऐरोली या ठिकाणी पर्जन्यमापक यंत्रे बसविण्यात आली आहेत. यातून नोंदवलेल्या पावसाच्या नोंदी पाहिल्या असता यंदाच्या पावसाने गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद केली आहे. तर दरवर्षी सरासरी दोन ते अडीच हजार मिमी पडणारा पाऊस यंदा म्हणजे सन २०१९मध्ये थेट चार हजार मिमीवर झेपावला आहे. 

 
आता ते चिखलाने भरले आहेत. त्यामुळे पाणी जाण्यासाठी पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे शहरातही पाणी साचू लागले आहे. सतत पडणाऱ्या या पावसामुळे शहरात आतापर्यंत २०० हून अधिक झाडे उन्मळून पडली आहेत आणि रस्ते उखडले आहेत. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्येही पाणी साचू लागले आहे. त्यामुळे वाहनचालकांना या खड्ड्यांतून वाहन चालविण्याची कसरत करावी लागत आहे. यातून लहानसहान अपघातही होत आहेत. 
आता वसलेल्या नवी मुंबई शहरात पूर्वी बहुतांश भाग हा खाडीचा आणि मिठागरांचा होता. त्यामुळे कितीही पाऊस पडला तरी पाणी झिरपून जात होते आणि राहिलेले ठाणे खाडीला मिळत असे. मात्र आता या मिठागरांच्या आणि खाडीच्या जागांवर अनेक उंच इमारती, गृहसंकुले आणि आधुनिक असे शहर उभे राहिले आहे. शिवाय शहरातील अतिरिक्त पाण्याचा साठा करण्यासाठी असलेले होल्डिंग पॉण्ड उभारले गेले आहेत. 

. नवी मुंबईत तर गेल्या दहा वर्षांच्या सरासरी पावसाची नोंद पाहिली असता सर्वाधिक पावसाची नोंद या वर्षी झाली आहे. इतकेच नव्हे तर आणखी पाऊस पडल्यास यंदाचे पावसाचे प्रमाण दुपटीवर झेपावण्याची चिन्हे आहेत.


गेल्या दहा वर्षांतील नोंदी

सन पाऊस

२०१० २३६४. ८० मिमी.

२०११ २६०८.५० मिमी.

२०१२ २३२६.३९ मिमी.

२०१३ ३३४७.२३ मिमी.

२०१४ २५२९.६६ मिमी.

२०१५ १६१४.०४ मिमी.

२०१६ २७०६.४२ मिमी.

२०१७ ३१२३.७८ मिमी.

२०१८ २६३६.७८ मिमी.


Web Title highest rainfall in ten years in navi mumbai
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com