Panipat Trailer : 'मैं इस धरती के मिट्टी के एक कण के लिए भी मरने को तय्यार हूँ!'

Panipat Trailer : 'मैं इस धरती के मिट्टी के एक कण के लिए भी मरने को तय्यार हूँ!'


मुंबई: सदाशिवराव पेशवे यांच्या भूमिकेत अर्जून कपूर तर पार्वतीबाईंच्या भूमिकेत क्रिती सेनन हुबेहुब बसले आहेत. कालपासून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे, ती म्हणजे संजय दत्तने साकारलेल्या अहमद शाह अब्दालीची. पानिपतची तिसरी लढाई ही मराठे व अहमद शाह अब्दाली यांच्यात झाली होती. 14 जानेवारी 1761 ला हरियानातील पानिपत येथे ही लढाई झाली होती. सदाशिवराव पेशवे यांच्या नेतृत्वात मराठ्यांनी ही लढाई लढली होती. या लढाईत अहमद शाह अब्दालीच्या सैन्याने मराठा सैन्याचा पराभव केला होता. 

तीन मिनिटे चौदा सेकंदाचा हा ट्रेलर पुन्हा आपल्याला पानिपतच्या त्या युद्धभूमीवर घेऊन जातो. मराठ्यांनी सांडलेलं रक्त, बाजीराव पेशव्यांनी पानिपतच्या लढाईसाठी सदाशिवरावांची केलेली निवड, सुख-दुःखात त्यांच्यासोबत खंबीरपणे उभी राहिलेली त्यांची पत्नी पार्वतीबाई व करारी नजरेने समोर उभा ठाकलेला अहमद शाह अब्दाली! या सगळ्याची सांगड घालत युद्धभूमीवरच्या पराक्रमाची कहाणी सांगणारा हा चित्रपट नक्कीच सर्वांसाठी आकर्षण असेल. 

'मराठा, भारतभूमी के वो योद्धा जिनके लिए उनका धर्म और कर्म उनकी वीरता है', 'सुख मे आपके पिछे व दुःख में आपके आगे खडी रहूंगी' असे दर्जेदार डायलॉग या ट्रेलरमध्ये दिसतायत. मोहनीश बहल, पद्मिनी कोल्हापूरे, झीनत अमान, सुहासिनी मुळ्ये, गश्मीर महाजनी अशी तगडी स्टारकास्ट या टित्रपटात दिसेल. आशुतोष गोवारीकरांचे कमबॅक आणि नितीन चंद्रकांत देसाई यांचे भव्यदिव्य सेट यांमुळे या ट्रेलरला चार चाँद लागले आहेत. 6 डिसेंबरला पानिपत सर्वत्र प्रदर्शित होईल.       

Web Title: Hindi movie Panipat trailer released

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com