हिंदू स्मशानभूमीतील गॅस दाहिनीची नागरिकांकडून तोडफोड

हिंदू स्मशानभूमीतील गॅस दाहिनीची नागरिकांकडून तोडफोड
amaravti news

अमरावती - शहरातील हिंदू Hindu स्मशानभूमीत Hindu cemetery नव्याने लावण्यात येणाऱ्या तिसऱ्या गॅस दाहिनीला परिसरातील नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. त्यासाठी नागरिकांनी भारतीय जनता पक्षाच्या BJP नेतृत्वात वेळोवेळी निवेदने आणि आंदोलन Protest केली मात्र प्रशासनाने कुठलाही ठोस निर्णय न घेतल्याने अखेर आज संतप्त नागरिकांनी हिंदू स्मशानभूमीत गॅस दाहिनीची तोडफोड vandalized केली. तसेच सामानाची फेकाफेक केली. विशेष म्हणजे आज झालेल्या या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सक्रिय सहभाग होता.Hindu cemetery vandalized by citizens

कोरोना रुग्णांच्या मृत्यु संख्येत वाढ झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने हिंदू स्मशानभूमीत तिसरी गॅस दाहिनी बसविण्यासाठी मंजुरी दिली. मात्र यापूर्वीच दोन गॅस दाहिन्या पूर्ण क्षमतेने सुरू असून परिसरातील नागरिकांना त्याचा भयंकर त्रास सहन करावा लागत आहे. अग्नी दिलेल्या प्रेतांची राख गॅस दाहिनीच्या चिमणीमार्फत बाहेर पडून परिसरातील नागरिकांच्या घरात आणि घराच्या छतांवर जमा होत असल्याने नागरिकांनी तिसऱ्या दाहिनीला विरोध दर्शविला आहे.  

यापूर्वी भारतीय जनता पक्षाचे प्रभागातील नगरसेवक,महाराष्ट्र प्रदेश भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्या नेतृत्वात आंदोलन आणि निवेदने देऊन या नागरिकांनी आपला विरोध दर्शविला. मात्र जिल्हा प्रशासनाने याबाबत कुठलाही निर्णय घेतला माही. तसेच गॅस दाहिनी लावण्यासाठी स्मशान संस्थेला साहाय्य केले असा आरोप नागरिकांनी यावेळी केला.या सर्व प्रकारामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आज हिंदू स्मशानभूमीत गोंधळ घातला. सर्कलच्या सुमारास तिसरी गॅस दाहिनी आणण्यात आल्याची माहिती परिसरातील नागरिकांना मिळाली. Hindu cemetery vandalized by citizens

तेव्हापासूनच महिलांनी आंदोलनाला सुरुवात केली.त्यानंतर भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, प्रभागातील नगरसेवक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश उर्फ पप्पू पाटील, महानगर प्रमुख संतोष बद्रे यांच्यासह दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते व परिसरातील नागरिक या ठिकाणी जमा झाले. यावेळी नागरिकांनी व मनसेच्या पदाधिकाऱयांनी गॅसदाहिनी उलटून टाकली व तोडफोड केली. तसेच अंत्यविधीसाठी लागणाऱ्या साहित्याची देखील यावेळी फेकाफेक करण्यात आली. घटनास्थळी राजापेठ पोलिसांचा ताफा पोचल्यानंतर त्यांनी परिस्थिती आटोक्यात आणली.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com