हिंगोलीत पुलावरुन चारचाकी खड्ड्यात पडल्याने ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोलीत पुलावरुन चारचाकी खड्ड्यात पडल्याने ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू
accident in hingoli

हिंगोली : हिंगोली Hingoli मधील राज्य महामार्गावरील पुलाच्या खड्ड्या मध्ये गाडी पडून ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू Death झाला आहे. हिंगोलीच्या जिंतूर- सेनगाव sengaon रस्त्यावर भरधाव वेगाने कार पुलाचे काम चालू असलेल्या खड्ड्यात पडली आहे. या भीषण अपघातात खड्ड्या मध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यात कार बुडुन चार जणांचा गुदमरुन मृत्यू झाले आहे.  Hingoli Accident Four Died After The Car Collapsed In Pothole

ही धक्कादायक घटना रात्री घडली आहे. शहराजवळ सेनगाव- जिंतूर रस्त्यावर रात्री बारा वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने येणारी कार पुलाचे काम सुरु असलेल्या खड्ड्यात पडली आहे. खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पावासाचे पाणी साचलेलं होते. त्यात कार बुडाली आहे. कारचे काच बंद असल्यामुळे त्यामधील चार जणांना गुदमरुन मृत्य झाले आहे.

विजय ठाकरे (रा. धनोरा), गजानन सानप, त्रंबक थोरवे आणि यांच्यासह एक अन्य लोणार तालुक्यातील रहिवासी असा ४ जणांना मृत्यू झाला आहे. रस्त्यावर वाहतूक नसल्याने हा प्रकार उशिरा लक्षात आला आहे. मद‍त मिळेपर्यंत ४ ही जणांचा मृत्यू झाला होता.  Hingoli Accident Four Died After The Car Collapsed In Pothole

हे देखील पहा -

मृतक आपल्या मुलांना क्लासेस लावण्यासाठी नांदेड येथे गेले असल्याचे समजत आहे. परत येताना असा दुदैवी प्रकार घडला आहे. रखडलेल्या पुलावर कोणताही बोर्ड न लावल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. पुढील तपास सुरु आहे.

Edited By - Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com