आवाज नायगावचा ग्रुप बनला देवदूत, लोकसहभागातून उभारले कोविड हाॅस्पिटल 

आवाज नायगावचा ग्रुप बनला देवदूत, लोकसहभागातून उभारले कोविड हाॅस्पिटल 
covid hospital nanded

नांदेड -  कोरोना Corona महामारीच्या काळात आज जो तो आपला जीव कसा बसा वाचवायचा याची धडपड करताना दिसत आहे. मात्र, नांदेड Nanded जिल्ह्यातील आवाज नायगावचा या व्हाॅटसप Whatsapp ग्रुपवरील सदस्यांनी माणुसकीचे दर्शन घडवित. साई माऊली Sai Mauli नावानं 50 खाटांचे कोविड हाॅस्पिटल Covid Hospital उभारत या ठिकाणी मोफत उपचार, जेवणाची सोय देण्यात येत आहे.  Hospital built through public participation

कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्या पध्दतीने मदतीचे हात समोर आले तसे दुसऱ्या लाटेत फारसे दिसत नाहीत. नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं कहर केल्यानं शासकीय यंत्रणा ही तोकडी पडु लागली आहे. हे पाहून नायगाव येथील व्हाॅटसप ग्रुपच्या सदस्यांनी लोकसहभातून कोविड हाॅस्पिटल उघडण्याची संकल्पना मांडली आणि ती 15 दिवसात सत्यात उतरवली. हे आता लोकसहभातून उभारलेले देशातील पहिले कोविड हाॅस्पिटल ठरले आहे.

हे देखील पहा -

सोशल मीडियावरील अवाहनाला प्रतिसाद देत दानशूर व्यक्ती समोर आले आणि पाहता पाहता कोविड  हाॅस्पिटल उभारण्यात आलं. आता गोरगरीब लोकं या कोविड हाॅस्पिटल मध्ये उपचार घेत आहेत. माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी या हाॅस्पिटलला शाळेची इमारत देत रुग्णांच्या मोफत जेवणाची सोय केली आहे. रुग्णाकडून खाजगी रुग्णालयातील डॉक्टर अव्वाच्यासव्वा बिल आकारत आहेत अशा तक्रारी मोठ्याप्रमाणात ऐकावयास मिळत आहेत. मात्र, नायगावच्या खाजगी डॉक्टर या रुग्णालयात मोफत सेवा देत आहेत. Hospital built through public participation

कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे बेड, व्हेंटिलेटर आणि ऑक्सीजन, रेमडेसिवीर इंजेक्शन मिळणं कठीण झाले आहे. अशातच आवाज नायगावच्या या व्हाॅटसप ग्रुपनं गोरगरिबांसाठी हॉस्पिटल उभारण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. हे नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com