भिवंडीत ब्रशच्या गोदामाला भीषण आग.. ( पहा व्हिडिओ ) 

भिवंडीत ब्रशच्या गोदामाला भीषण आग.. ( पहा व्हिडिओ ) 
bhiwandi fire

भिवंडी : भिवंडीत Bhiwandi आग लागण्याच्या घटना थांबयाच नाव घेत नाहीत. दापोडा Dapoda गावच्या हद्दीत हरिहर कॉम्प्लेक्समध्ये Harihar Complex असलेल्या रंग कामासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्रश कंपनीच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. A huge fire broke out in a brush warehouse in Bhiwandi 

गोदामाला लागलेल्या या आगीने Fire भीषण रूप धारण केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. दापोडा गावातील हरिहर कॉम्प्लेक्स येथे हॅरीस ब्रसेस इंडिया प्रा. लि. या कंपनीत मोठ्या प्रमाणात पेंटिंग ब्रश  बनवले जात असतात.   

मोठ्या प्रमाणावर ब्रश व केमिकलचा साठा या ठिकाणी साठविण्यात आले होते. या गोदामाला भीषण आग लागली असून आगीचे कारण अजून समजू शकले नाही. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भिवंडी , कल्याण Kalyan व ठाणे Thane  या ठिकाणाहून अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. A huge fire broke out in a brush warehouse in Bhiwandi

या आगीच्या घटनेची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. भिवंडीत आगी लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. मात्र, शासकीय यंत्रणा याकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात भिवंडीचा भोपाळ होऊ नये अशी भीती दक्ष नागरिक व्यक्त करत आहेत. 

Edited By- Digambar Jadhav
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com