'यास' चक्रीवादळाची तीव्रता आज वाढण्याचा अंदाज, अलर्ट जारी... (पहा व्हिडीओ)

'यास' चक्रीवादळाची तीव्रता आज वाढण्याचा अंदाज, अलर्ट जारी... (पहा व्हिडीओ)
cyclone

मुंबई : पश्चिम बंगाल West Bengal आणि ओरिसा Odisha  वर यास Yass चक्रीवादळाचा संकट घोंगावत आहे. बंगालच्या उपसागरात Bay of Bengal कमी दाबाचा पट्टाचे चक्रीवादळात रूपांतर झालं आहे. आणि हे चक्रीवादळ आज अति तीव्र रूप धारण करेल असा अंदाज हवामान विभागाकडून Wheather Department वर्तवण्यात आला आहे. सध्या ओरिसामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. Hurricane Yass is expected to intensify today

दरम्यान यास चक्रीवादळ उत्तर पश्चिम दिशेने याठिकाणी सरकणार असल्याचे इशारा देण्यात आलेला आहे. तर उद्या सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान ओरिसाच्या बलसोर किनारपट्टीवर हे चक्रीवादळ धडकेल असाही अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तसेच चक्रीवादळाचे लँडफॉल होताना  वाऱ्याचा वेग 155 ते 185 किलोमीटर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती देखील या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे . 

तर किनारपट्टी भागातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. तर  नौदल Navy आणि NDRF सह विविध पथके किनारपट्टी भागात तैनात करण्यात आलेली आहेत. Hurricane Yass is expected to intensify today

ओडीसा तून उद्या सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान बालसोरला हे वादळ धडकणार असल्याचा अंदाज आहे. आणि बुधवारी रात्री दहा वाजता ओरिसातल्या बारीपाडा भागात हे चक्रीवादळ धडकेल. 27 मे रोजी सकाळी आठ ते दहा दरम्यान झारखंड येथे हे वादळ पोहोचेल अशी शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. तर 27 मे नंतर चक्रीवादळाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. 

किनारपट्टी परिसरातील राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तर सव्वीस तारखेच्या पहाटे पर्यंत यास चक्रीवादळ ओरिसातल्या बसलो येथे धडकणार आहे. आणि त्यामुळे या वाऱ्याची गती 160 किलोमीटर पर्यंत वाढलेली असेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. 

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com