ICC Player of the Month: बांगलादेशचा फलंदाज ठरला मे महिन्याचा उत्कृष्ट खेळाडू 

ICC Player of the Month: बांगलादेशचा फलंदाज ठरला मे महिन्याचा उत्कृष्ट खेळाडू 
Saam Banner Template

बांगलादेशचा यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीम (Mushfiqur Rahim) याला आयसीसीने मे महिन्याचा प्लेयर ऑफ द मंथ (ICC Player of the Month) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अलीकडेच श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेदरम्यान रहीमने चमकदार कामगिरी बजावली होती, त्यामुळे त्याला सन्मानित करण्यात आले आहे. रहीम बांग्लादेशचा प्लेअर ऑफ़ द मंथ पुरस्कार जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. (ICC Player of the Month Bangladesh batsman named Player of the Month)

मे महिन्यात 'प्लेअर ऑफ द मंथ' बनण्याच्या शर्यतीत पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली आणि श्रीलंकेचा प्रवीण जयविक्रम यांना आयसीसीने नामांकन दिले होते. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत फलंदाजीत बांगलादेशच्या रहीमने वर्चस्व राखले. यामुळेच आयसीसीने त्यांला मे महिन्याचा हा पुरस्कार दिला आहे.

श्रीलंकेविरुद्ध रहीमने 3 एकदिवसीय सामन्यात 79 च्या सरासरीने 237 धावा केल्या. या दरम्यान त्याने एक शतक आणि एक अर्धशतकही केले. आयसीसीने जानेवारीपासून प्रत्येक महिन्यासाठी सर्वोत्कृष्ट खेळाडू निवडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आतापर्यंत भारताच्या 3 खेळडूंना आणि पाकिस्तानच्या एका खेळाडूला हा पुरस्कार मिळाला आहे. जानेवारीत महिन्यात ऋषभ पंत फेब्रुवारी महिन्यात अश्विनला आयसीसी प्लेअर ऑफ दी मंथ पुरस्कार मिळाला होता. यानंतर, भुवनेश्वर कुमारला मार्चमध्ये हा पुरस्कार मिळाला होता. एप्रिलमध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला आयसीसी प्लेयर ऑफ दी मंथ पुरस्कार मिळाला होता.

महिला क्रिकेटमध्ये स्कॉटलँडची अष्टपैलू खेळाडू कॅथरीन ब्राईसला आयसीसी प्लेयर ऑफ डी मंथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नुकत्याच आयर्लंडविरुद्द  झालेल्या सिरीजमध्ये कॅथरिनने 4 टी-20 सामने खेळले त्यात तिने 96 धावा बनवत 5 बळी घेतले होते.     

Edited By : Pravin Dhamale 

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com