आषाढी वारीचा निर्णय शासनाने बदलावा, अन्यथा आझाद मैदानात आंदोलनचा वारकऱ्यांनाचा इशारा
If the government changes the decision of Ashadi Wari it is a warning of agitation

आषाढी वारीचा निर्णय शासनाने बदलावा, अन्यथा आझाद मैदानात आंदोलनचा वारकऱ्यांनाचा इशारा

सोलापूर : कोरोनाच्या Corona तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन, महाराष्ट्र Maharashtra राज्य शासनाने State Government यंदा ही आषाढी पायी वारीचा निर्णय रद्द केला आहे. यावरून अखिल भाविक वारकरी मंडळाने टोकाची भूमिका घेतली आहे.

शासनाचा निर्णय मान्य नसल्याच त्यांनी जाहीर केले आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेला निर्णय लवकरात लवकर बदलावे, नाहीतर आझाद मैदानात Azad Maidan, आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. याबाबत प्रधानमंत्री कार्यालय आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडे  रितसर ऑनलाईन तक्रार ही दाखल करण्यात आली आहे.

आषाढी वारी ही पायी झाली पाहिजे, यासाठी अखिल भाविक वारकरी मंडळ महाराष्ट्र सरकारच्या संपर्कात होते. मात्र, शासनाने वारकऱ्यांचा विचार नकरता फक्त प्रशासन यंत्रणेवर ताण पडू नये, म्हणून हा निर्णय घेतला आहे. असा आरोप ही यावेळी अखिल भाविक वारकरी मंडळाकडून करण्यात आला आहे. पीएमओ कार्यालयाने याबाबत अखिल भाविक वारकरी मंडळाच्या तक्रारीची दखल घेऊन डेप्युटी सेक्रेटरी जे.जे.वाळवे यांची नियुक्ती या संदर्भात केली आहे, असा दावा देखील करण्यात आला आहे. 

16 जूनला अखिल भाविक वारकरी मंडळाकडून जिल्हा परिषद सोलापूर समोर पायी वारीकरिता 'भजन आंदोलन' करण्यात येणार आहे. हे करून सुद्धा शासनाने आषाढी वारी संदर्भातील निर्णयाचा फेरविचार नाही केला, तर आझाद मैदान, मुंबईमध्ये 'भजन आंदोलन' करण्यात येईल असा इशारा ही यावेळी देण्यात आला आहे. 

हे देखील पहा 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा जपण्यासाठी किमान 50 भाविकांना आषाढी वारीमध्ये पायी सहभागी होण्याची परवानगी द्यावी अशी विनंती ही यावेळी करण्यात आली आहे. शासनाने आषाढी वारीच्या निर्णयाचा फेरविचार नाही केला, तर समस्त महाराष्ट्रातील वारकऱ्यांना 'कस ही निघा वारीला निघा' हे आवाहन करण्यात येणार आहे, आणि त्यावेळेस लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपूरच्या दिशेने बाहेर पडला तर त्याला महाराष्ट्र राज्य शासन जबाबदार असेल असा इशारा ही यावेळी देण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com