नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले तर...

नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले तर...
shelarshelar

मुंबई - नवी मुंबईत Navi Mumbai उभारण्यात येणाऱ्या विमानतळाला Airport हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray यांचे नाव दिले तर त्याला आमचा विरोध नाही. पण बाळासाहेब ठाकरे यांचे नाव किती ठिकाणी असावे याचा विचार व्हायला हवा. नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील Dinkar Balu Patil यांचे नाव देण्यात येणार असेल तर भाजप त्याला कधीच विरोध करणार नाही, असे भाजपचे आमदार आशिष शेलार Ashish Shelar म्हणाले आहेत. दि. बा. पाटील यांचे कार्य मोठे आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी त्यांचे नाव द्यायचे आहे, त्या ठिकाणी आमचा विरोध नसेल, असेही ते म्हणाले. If the name of Balasaheb Thackeray is given to Navi Mumbai Airport then 

राज्याच्या राजकारणात आता भाजप विरूद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष सुरू असून दररोज आरोप-प्रत्यारोपाचे खेळ सुरू असतात.  त्यातच आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यायचे या मागणीवर शिवसेनेचे नेते आडून आहेत.

हे देखील पहा -

तर दुसरीकडे दि. बा पाटील यांचे नाव या विमानतळाला दिले गेले पाहिजे अश्या मुद्द्यासाठी नवी मुंबईतील विविध गावांतील नागरिक आणि स्थानिक आमदार आग्रही आहेत. याच मागणीसाठी काल नवी मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये नागरिकांनी आणि  आगरी व कोळी बांधवांनी मानवी साखळी आंदोलन केले. भूमिपुत्रांच्या या मागणीला आशिष शेलारांनी जाहीर पाठिंबा दिला.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com