तुम्ही रेल्वे बुकींग करताय, मग हे वाचाच ! 

तुम्ही रेल्वे बुकींग करताय, मग हे वाचाच ! 


पहिल्या दिवशी १२ मे रोजी राजधानी दिल्लीतून एकूण १५ रेल्वे प्रवासासाठी निघतील. १५ ठिकाणांच्या पहिल्या टप्प्यात नवी दिल्ली ते दिब्रुगढ (आसाम), आगरतला, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदाराबाद, बंगळुरू, चेन्नई, तिरुअनंतरपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मू तवीसाठी या विशेष रेल्वेचं संचालन होईल. देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान ठिकठिकाणी अडकलेल्या नागरिकांना आपल्या घरी पोहचवण्यासाठी भारतीय रेल्वेनं काही रेल्वेचं बुकींग आजपासून सुरू करण्याचा निर्णय घेतलाय.  


मंगळवारपासून राजधानी दिल्लीतून १५ स्पेशल रेल्वे चालवल्या जाणार आहेत. देशव्यापी लॉकडाऊन २५ मार्चपासून सुरू झाल्यानंतर देशातील सर्व प्रवासी वाहतूक बंद झाली होती. त्यानंतर श्रमिकांना स्वगृही पोहोचवण्यासाठी रेल्वेने गेल्या काही दिवसांपासून विशेष गाड्या चालवल्या आहेत. आता त्यापुढे एक पाऊल रेल्वेनं टाकलंय. या विशेष रेल्वेसाठी सोमवारी सायंकाळी ४ वाजता ऑनलाईन तिकीट बुकींग होणार आहे. या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची थर्मल स्क्रिनिंग होणार आहे. ज्या व्यक्तीत करोनाची कोणतीही लक्षणं आढळणार नाहीत केवळ त्यांनाच प्रवासाची परवानगी देण्यात येणार आहे. जर तुम्हीही या रेल्वेचं बुकींग करणार असाल तर या रेल्वेचं तिकीट बुकींग, मार्ग, टाईम-टेबल आणि भाडं किती असेल याची माहिती जाणून घ्या...


मजूर, कामगार आणि इतर गरजवंतांसाठी श्रमिक विशेष रेल्वे अगोदर प्रमाणेच सुरू राहतील. मजुरांकडून कोणत्याही प्रकारे भाडं न आकारता त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी सोडलं जाईल. यासाठी तत्काळ किंवा प्रिमियम तत्काळ तिकीट मिळणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला वेळेतच तुमचं तिकीट बुकिंग करावं लागणार आहे.

या विशेष रेल्वेसाठी राजधानी रेल्वे प्रमाणे तकीट आकारणी होईल. या सर्व रेल्वेमध्ये एसी कोच लावण्यात आलेले आहेत. याचा थेट परिणाम प्रवाशांच्या खिशावर होणार आहे. लॉकडाऊन दरम्यान ज्या प्रवाशांना प्रवास करायचा आहे त्यांना एसी तिकिटाचे पैसे मोजण्यासाठी तयार राहावं लागेल. विशेष रेल्वे गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे कन्फर्म तिकीट असेल तरच त्यांना रेल्वे स्थानकात प्रवेश देण्यात येणार आहे

श्रमिक विशेष रेल्वेला २४ डबे असून प्रत्येक डब्यामध्ये ७२ जणांना प्रवासाची क्षमता आहे. मात्र, सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी केवळ ५४ व्यक्तींनाच एका डब्यामध्ये बसवले जाते. प्रत्येक रेल्वेमागे ८० लाख रुपये खर्च आल्याची शक्यता आहे. केंद्र-राज्य सरकार हा खर्च ८५-१५ टक्के उचलतील, असं यापूर्वीच सरकारनं स्पष्ट केलंय.
मुंबई महानगर प्रदेशातून रविवारपर्यंत १९ श्रमिक एक्स्प्रेस चालवण्यात आल्या. यापैंकी बहुतेक गाड्या उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहारसाठी सोडण्यात आल्या. गेल्या दहा दिवसांत देशभरातून ३६६ श्रमिक एक्सप्रेस चालवण्यात आल्या आहेत. मुंबईत अडकलेल्या परराज्यातील श्रमिकांसाठी सीएसएमटीसह दादर, एलटीटी, ठाणे, भिवंडी, पनवेल येथून एक्स्प्रेस रवाना करण्यात आल्या. प्रत्येक गाड्यांमध्ये १२०० प्रवाशांच्या जवळपास प्रवासी श्रमिक होते.  


या विशेष रेल्वेगाड्यांमध्ये पॅन्ट्री कारची सुविधा नसेल. आपल्या ठिकाणी लवकरात लवकर पोहचण्यासाठी या गाड्या सीमित रेल्वे स्टेशनवर थांबतील. सोबतच रेल्वे प्रवासात प्रवासी करोनापासून दूर राहतील, याचा सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहे. रेल्वे प्रवाशांनी मास्क परिधान करणं आवश्यक राहील तसंच रेल्वे प्रवासाअगोदर स्वास्थ्य ठिक असेल तरच प्रवासाची परवानगी दिली जाईल. अन्यथा तिकीट असेल तरीही परवानगी नाकारली जाईल.
 

पहिल्या टप्प्यात तिकीट बुकींग आज (सोमवार) सायंकाळी ४ वाजेपासून सुरू होईल. प्रवाशांना तिकीट खिडकीवर बुकींग करता येणार नाही. तर IRCTC च्या वेबसाइटवरून किंवा अॅपवरून हे बुकींग करावं लागेलं. (https://www.irctc.co.in/) रेल्वे स्थानकांवरील काउंटर वरून कुठल्याही प्रकारचे तिकीट दिले जाणार नाही. इंडिव्हिज्युअल युझरच्या अकाऊंटवरूनच हे तिकीट बुक केले जाऊ शकतील. यासाठी एजंटमार्फत तिकीट मिळणार नाही, असं रेल्वेनं स्पष्ट केलंय. 


WebTittle :: If you are booking a train, then read this!


 

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com