सव्वाचार कोटीचे अवैध बियाणे जप्त; प्रशासनाची धडक कारवाई

सव्वाचार कोटीचे अवैध बियाणे जप्त; प्रशासनाची धडक कारवाई
Illegal seeds worth Rs 4.25 crore seized by administration

यवतमाळ : बीज प्रक्रिया केंद्रात अवैधरित्या तयार करण्यात आलेले ४ कोटी २० लाख रुपयाचे बियाणे Seed जब्त करण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातील बोरी अरब येथे कृषी विभागाने ही धडक कारवाई केली आहे. कृषी विभागाच्या ३ पथका कडून ही कारवाई करण्यात आली आहे. Illegal seeds worth Rs 4.25 crore seized by administration

बियाण्यांमध्ये तूर, सोयाबीन आणि हरभऱ्याचा समावेश आहे . बोरी अरब येथे धरतीधन सीड प्रोसेसिंग प्लांट मध्ये अवैधरित्या बियाणे तयार केलं जात होते. खुल्या बाजारातून सोयाबीन ,तूर ,चणा आणायचा आणि मशिनमधून छाटणी करून बॅग भरायची. तयार झालेली ३० किलोची बॅग शेतकऱ्यांच्या माथी मारायची असा हा त्यांचा गोरखधंदा चालू होता. 

कमी दरात बियाणे मिळत असल्याने आशेपोटी शेतकरी ही बियाणे खरेदी करत होते. या बियाण्यांचा अखेर भंडाफोड करण्यात आला. गुप्त  माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या बीज प्रक्रिया केंद्रावरून ८५० क्विंटल  सोयाबीन, ६६० क्विंटल तूर, १७८० क्विंटल लूज सोयाबीन आणि २७०० क्विंटल चणा आदी जब्त करण्यात आले.

या मालाची किंमत ४ कोटी २० लाख असल्याचे तपास पथकाकडून सांगण्यात आले. बोगस बियाणे तयार करणाऱ्यांविरुद्ध अशीच धडक कारवाई करणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे . ऐन पेरणीच्या आधी हा भांडाफोड झाल्याने अवैध धंदे करण्याऱयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com