अंबाजोगाईची घटना दुर्दैवी; दुःख व्यक्त करू की संताप करू समजना - पंकजा मुंडे
pankaja munde news

अंबाजोगाईची घटना दुर्दैवी; दुःख व्यक्त करू की संताप करू समजना - पंकजा मुंडे

बीड -  बीड Beed जिल्ह्यात कोरोनाचा वाढता आकडा चिंताजनक Worrying असताना आता मृत्युदर Death rate देखील वाढला आहे. दोन दिवसांमध्ये तब्बल 30 कोरोनाबाधित  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाचा Corona प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. वाढत्या रुग्णसंख्येसोबतच मृतांची संख्याही वाढत असल्याने येथे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. शनिवार व रविवार या दोनच दिवसात अंबाजोगाईत ambajogai कोरोनामुळे मृत झालेल्या 25 रुग्णांवर नगरपरिषदेने अंत्यसंस्कार केले. The incident of Ambajogai is unfortunate - Pankaja Munde

यात 23 जणांना अग्नीडाग तर 2 जणांचा दफनविधी करण्यात आलाय. तर दोन दिवसात तब्बल 1800 जणांनी कोरोनावर मात केली आहे.  सध्या अंबाजोगाईतील स्वाराती आणि लोखंडीच्या कोविड सेंटरमध्ये मिळून हजार पेक्षाही अधिक कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत. तर, अनेक जण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत.

दररोज शेकडो रुग्ण कोरोनामुक्त होत असल्याचे चित्र दिलासादायी असले तरी दुसऱ्या लाटेतील मृत्यूंची आकडेवारी मात्र चिंतेत भर घालणारी आहे.बीड जिल्ह्यात सध्या ॲक्टिव रुग्णांची संख्या आठ हजारांच्या घरात आहे.  कोरोना पॉझिटिव्हचा दर आणि मृत्यूचा दर देखील वाढला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांवर अंत्यसंस्कार करत असताना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.  

दरम्यान या घटनेवर आता पंकजा मुंडे Pankaja Munde यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, अंबाजोगाईत 23 मृतदेहांना एकाच ॲम्बुलन्समध्ये Ambulance कोंबून नेण्याचा प्रकार, हा अतिशय दुर्दैवी असून यावर दुःख व्यक्त करू की संताप व्यक्त करू समजना. The incident of Ambajogai is unfortunate - Pankaja Munde

याविषयी स्वाराती रुग्णालयाच्या डीनशी बोलले असता, त्यांनी याविषयी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन ॲम्बुलन्सची मागणी केल्याचं सांगितलं. हे अतिशय दुर्दैवी असून स्वतःची जबाबदारी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर ढकलली. कलेक्टरांना प्रश्न केला तर त्यांचं असं झालंय की ते बोलुचं शकत नाहीत.अशी प्रतिक्रिया अंबाजोगाईच्या घटनेवरून भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी दिलीय. दरम्यान "कलेक्टरांचं असं झालंय की ते बोलुचं शकत नाहीत" या पंकजा मुंडेंच्या वक्तव्याचा रोक नेमकं कुणाकडं ? याविषयी आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

Edited By - Shivani Tichkule

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com