शहरात भर दिवसा लुटमारीचा प्रयत्न; सहकार भुवन समोरील घटना

शहरात भर दिवसा लुटमारीचा प्रयत्न; सहकार भुवन समोरील घटना
police karavi

अमरावती - शहरातील खत्री कम्पाऊंडला लागून असलेल्या येस बँके Yes Bank मधून मनोज चौधरी Manoj Chaudhari या युवकाने आज सकाळी १९ लाख रुपये Money काढले व बँकेतून काही अंतरावर मनोज गेला असता काही अज्ञात आरोपींनी Accused त्याच्या जवळीस बॅग Bag हिसकण्याचा प्रयत्न केला मात्र मनोजने प्रतिकार केला असता ते तिन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. मात्र या घटनेने परिसरात चांगलीच दहशत पसरली आहे. Incident in front of Sahakar Bhuvan

पोलीस Police सूत्रांच्या मिळालेल्या माहिती नुसार आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास एका खाजगी कपंनी मध्ये कार्यरत असलेला मनोज चौधरी या युवकाने बॅंके मधून १९ लाख रु काढलेत व परत निघाला असता सहकार भुवन समोर त्याला तीन युवकांनी घेरत त्यांच्या जवळील असलेली पैशाची बॅग हिसकण्याच्या प्रयत्न केला. यावेळी या आरोपींपैकी एकाने मिरची पावडर मनोजच्या डोळयावर फेकली तर दुसऱ्या आरोपीने चाकूने मनोज वर हल्ला केला.

हे देखील पहा -

यावेळी आरोपी आणि मनोज मध्ये हाथापायी सुद्धा झाली मात्र मनोजने याचा जोरदार प्रतिकार केला व आपल्या जवळील बॅग सोडली नाही आणि प्रतिकार केला.  यावेळी तिन्ही आरोपी बालाजी मंदिर जवळील गल्ली मधून पसार झालेत. घटनेची माहिती सिटी कोतवाली पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळावर तात्काळ दाखल झाली व पुढील तपस सुरु केला. Incident in front of Sahakar Bhuvan

पोलिसांनी या परिसरात दुकानाबाहेर लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले असता यात आरोपी दिसून आले. मात्र त्यांचे चेहरे स्पष्ट दिसून आले नाहीत. यानंतर पोलिसांनी लगेच डॉग सॉडची मदत घेतली मात्र त्यातही फारशी मदत पोलसांना मिळाली नाही. तर पोलिसांनी आरोपी ज्या दुचाकीने आले होते त्या गाडीचा नंबर मिळाला असून कोतवाली पोलीस पुढील तपास करीत आहे. मात्र दिवसा ढवळ्या झालेल्या या घटनेने परिसरात चांगलीच दहशत निर्माण झाली आहे

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com