शिर्डी-सरकारी सार्वजनिक विहीर गेली चोरीला ?

शिर्डी-सरकारी सार्वजनिक विहीर गेली चोरीला ?
Incident of theft of a government public well

शिर्डी: राज्यात अनेक छोट्या मोठ्या वस्तूंच्या चोरीच्या घटना घडत असतात. अश्याच एक मोठ्या वस्तूच्या मोठ्या चोरीचा प्रकार घडला आहे अहमदनगर Ahmednagar मध्ये. अहमदनगरच्या राहुरी RAhuri तालुक्यातील म्हैसगावात सरकारी सार्वजनिक विहीर चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. Incident of theft of a government public well

गेल्या अनेक वर्षांपूर्वी नागरिकांना हक्काचं पाणी मिळावे, ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न सुटावा, म्हणून त्यांना मुबलक पाणी मिळावे या हेतूने सरकारने पाच-सहा दशकापूर्वी अतिशय दुर्गम आणि डोंगराळ भागातील गावांमध्ये सार्वजनिक विहिरींची निर्मिती केले आहे. पूर्वी त्या विहिरीला आड असे म्हणत.

ग्रामस्थही गुण्या-गोविंदाने म्हैसगावात या विहिरीच्या पाण्याने तहान भागवत होते. मात्र सार्वजनिक विहिर चोरीला गेल्याने भविष्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागणार असल्याचं ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे.

गाव नमुना नंबर १४ सार्वजनिक दोन विहिरी पिण्याच्या पाण्याची नोंद आहे. म्हैसगाव मध्ये माझी बदली होऊन तीन वर्षे झाली आहे त्यामुळे रेकॉर्ड पाहिल्याशिवाय मला याविषयी काही बोलता येणार नाही अशी माहिती ग्रामसेवक शिवाजी पाटेकर यांनी दिली.

गावात दोन सार्वजनिक विहिरी ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे. त्या विहिरींची नोंदणी सरकारी दरबारी आहे. परंतु कालांतराने पाण्याच्या विविध श्रोतामुळे विहिरीकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी त्या विहिरीकडे गाव कारभाऱ्यासह अनेकांचा डोळा होता. सर्वांचे दुर्लक्ष झाल्याने काहींनी हा डाव साधत ही विहीर बुजवून टाकली.

हे देखील पहा - 

गावातील तलाठी कार्यालय दप्तरी पाणीपुरवठा गाव नमुना नोंदवहीमध्ये या दोन सार्वजनिक विहिरी ची नोंद आहे एक विहीर गावठाण तर दुसरी विहीर 354 गट नंबर मध्ये आहे. सदरील दोन्ही विहिरी सरकारच्या नावे असल्याचे आढळून आले आहे. तशी माहिती तलाठी आणि ग्रामसेवकांनी दिली आहे. मात्र गावात पाहणी केली असता एकच विहीर दिसून येत आहे.

चोरी गेलेली सार्वजिनिक विहीर सापडून द्या अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. मात्र गाव पुढार्‍यांच्या भीतीपोटी गावातील नागरिक कॅमेऱ्यासमोर बोलण्यास तयार नाहीत. गावाच्या सार्वजनिक विहिरीच्या चोरीच्या घटनेत कोण कोण सहभागी आहे. गाव कारभारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांसह संबंधितावर काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com