गोंदिया जिल्ह्यात 'म्युकरमायकोसीसच्या' रुग्णांमध्ये वाढ

गोंदिया जिल्ह्यात 'म्युकरमायकोसीसच्या' रुग्णांमध्ये वाढ
black fungus

कोरोनानंतर (Coronavirus) आता गोंदिया जिल्ह्यात (Gondia District) म्युकरमायकोसीसने (Mucormycosis) हातपाय पसरायला सुरुवात केली असून गोंदिया जिल्ह्यात तब्बल 44 म्युकरमायकोसीसचे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत 5  म्युकरमायकोसीस रुग्णांचा मृत्यु झाला आहे. (Increase in the number of patients with 'Mucormycosis' in Gondia district)

गोंदिया जिल्ह्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात 44 रुग्णांत म्युकरमायकोसीस आजार आढळला आहे. कोरोनातुन बरे झालेल्या विशेषता मधुमेह व इतर आजार असलेल्या रुग्णांना काळी बुरशी (म्युकरमायकोसीस) (Black Fungus) या आजाराचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे. वाढती म्युकरमायकोसीस रुग्णाची संख्या लक्षात घेता जिल्ह्यात आता कोरोनानानंतर हा आजार धडकी भरवत आहे.

 हे देखील पाहा 

दरम्यान, राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्याचबरोबर, देशात काळी बुरशी, पांढरी बुरशी आणि पिवळी बुरशीचे रुग्ण वाढत आहे. अद्याप या आजाराची परिस्थिती आटोक्यात असल्याचं सरकारकडून (Maharashtra Government) सांगण्यात येत आहे. म्युकरमायकोसीससाठी आवश्यक असलेल्या औषधांचा तुटवडा नसल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे.    

Edited By : Pravin Dhamale 

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com