ICC क्रिकेट वर्ल्डकपसाठी संघांमध्ये वाढ

 ICC क्रिकेट वर्ल्डकपसाठी संघांमध्ये वाढ
icc

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) पुरुषांच्या विश्वचषका संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. मंगळवार, 1 जूनला दुबई येथे आयसीसी बोर्डाच्या बैठकीत या स्पर्धेत किती संघ सहभागी होणार यावर एकमत झाले आहे. एकदिवसीय विश्वचषकात खेळणार्‍या 10 संघांची संख्या वाढवून 14 करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर टी-20 विश्वचषकात (T-20 World Cup) भाग घेणाऱ्या एकूण संघांची संख्या 20 करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Increase in teams for ICC Cricket World Cup)

टी -20 आणि एकदिवसीय विश्वचषका संदर्भात काही महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत घेतले जाणार आहे. आयसीसीच्या या बैठकीकडे सर्वजण डोळे लावून बसले होते. या बैठकीत सध्याच्या एकदिवसीय पुरुष विश्वचषकात बदल करण्याचे मान्य केले. 

हे देखील पाहा

2027 आणि 2031 या सालचे विश्वचषक 2003 च्या विश्वचषक फॉरमॅट नुसार होणार असल्याचा आयसीसीने  स्पष्ट केले आहे. नवीन नियमानुसार 7-7 संघ दोन वेगवेगळ्या गटात ठेवण्यात येतील. दोन्ही गटांतील पहिल्या तीन संघांना सुपर सिक्समध्ये जाण्याची संधी मिळणार आहे. त्यांनतर, पुन्हा उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठी संघ जाहीर केले जातील. या व्यतिरिक्त यावर्षी भारतात खेळला जाणारा टी -20 विश्वचषकावर देखील चर्चा झाली. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे भारतातील स्पर्धा आयोजबबाबत शंका आहे.

सध्या आयसीसीने बीसीसीआयला जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत म्हणजेच 28 जूनपर्यंत मुदत दिली आहे. आयसीसीला स्पर्धा आयोजनाबत त्याच तारखेला भारतीय बोर्डला सांगावं लागेल.

Edited By : Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com