भारतीय रेल्वेचा कोविड- १९ शी लढा, रोज अनेक कर्मचारी होतात संक्रमित 

भारतीय रेल्वेचा कोविड- १९ शी लढा, रोज अनेक कर्मचारी होतात संक्रमित 
In Indian railways thousands of employees get infected every day due to Covid

नवी दिल्ली: पीयूष गोयल Piyush Goyal यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भारतीय रेल्वेने Indian Railway गेल्या वर्षभरापासून कोविड -१९ लाटेमध्ये स्टेशन मास्टर्स सारख्या फ्रंटलाइन कर्मचार्‍यांसह 1,952 कर्मचारी गमावले आहेत. रेल्वे मंत्रालयाच्या Railways Ministry म्हणण्यानुसार, आताही जवळपास एक हजार रेल्वेमार्गावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दररोज कोविडची Covid 19 लागण होत आहे.

रेल्वे बोर्डाचे Railway board अध्यक्ष सुनीत शर्मा यांनी आयईच्या वृत्तानुसार सांगितले आहे की, सध्य ४००० बेड वापरात आहेत. गेल्या वर्षी मार्चपासून कोविड -१९ मुळे कालपर्यंत १९५२ रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय रेल्वेने बेडची संख्या वाढवून रेल्वे रूग्णालयात ऑक्सिजन प्लांट्स तयार केले आहेत. अशी माहिती त्यांनी दिली. 

हे देखील पहा -

ऑल इंडियन स्टेशन मास्टर्स असोसिएशन All Indian Station Masters’ Association (एआयएसएमए) च्या म्हणण्यानुसार, कोरोना या आजारामुळे  आतापर्यंत ११३ स्टेशन मास्तरांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी बहुतेक यंदाच्या दुसर्‍या लाटेत मरण पावले आहेत. रेल्वे संरक्षण दलाने Railway Protection Force (आरपीएफ) आतापर्यंत ५० पुरुष कर्मचारी गमावले आहेत. असोसिएशनने रेल्वे बोर्ड आणि अनेक रेल्वे विभागांना पत्र पाठवून या प्रत्येकासाठी ५० लाख रुपयांचे विशेष विमा संरक्षण तसेच त्वरित लसीकरण यासारख्या वस्तूंची मागणी केली आहे.

अनेक स्टेशन मास्टर आजारी पडल्यामुळे रेल्वे स्थानकांना स्टेशन मास्टरशिवाय सोडले जाऊ शकत नसल्याने उर्वरित कर्मचार्‍यांना ओव्हरटाईम काम करावे लागत आहे. असेही त्यांनी सांगितले. 

भारतीय रेल्वेच्या कर्मचारी संघटना- भारतातील Employees’ unions of Indian Railways- India सर्वात मोठी व्यावसायिक उपयोगिता मालकांनी असे नमूद केले आहे की, महामारीच्या वेळी कोरोना व्हायरसने जवळपास एक लाख कर्मचाऱ्यांना संक्रमित केले असून त्यातील आतापर्यंत दोन तृतियांश बरे झाले आहेत. सध्या तेथील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार रेल्वे कर्मचार्‍यांना लसीकरण करण्यावर भर देण्यात आला आहे.

अनेक रेल्वे क्षेत्र आणि विभागांमध्ये राज्य सरकारांशी समन्वय साधून बॅचमधील कर्मचार्‍यांना त्यांच्या डिव्हिजन मध्ये लस देण्याचा भारतीय रेल्वेचा प्रयत्न सुरू आहे. अहवालानुसार, जेव्हा  फ्रंट लाईन कामगारांसाठी लसीकरण सुरू होते तेव्हा रेल्वे वैद्यकीय कर्मचारी आणि आरपीएफच्या जवानांचे लसीकरण केले गेले आहे. तथापि, स्टेशन मास्टर्स, तिकिट चेकर, गार्ड आणि ड्रायव्हर्स यासारख्या इतर श्रेण्यांचा त्या ड्राइव्हमध्ये समावेश नव्हता.

अलीकडेच, अखिल भारतीय रेल्वेमेन फेडरेशनने All India Railwaymen’s Federation रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहून कोरोनाच्या संकटाच्या वेळी काम करताना आपला जीव गमावलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना नुकसानभरपाईची मागणी केली आहे. 

Edited By- Sanika Gade

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com