चंद्रपुरातील बिथरलेल्या गजराज हत्तीला कार्यमुक्त करण्याचे संकेत ( पहा व्हिडिओ )

चंद्रपुरातील बिथरलेल्या गजराज हत्तीला कार्यमुक्त करण्याचे संकेत ( पहा व्हिडिओ )
hatti news

चंद्रपूर: चंद्रपूर Chandrapur जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील Tadoba-Andhari Tiger Project गजराज हत्तीला कार्यमुक्त करण्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहेत. प्रकल्पातील बोटेझरी Botezari भागात माजावर आलेल्या गजराजने काल मुख्य लेखापाल Chief Accountant प्रमोद गौरकार Pramod Gaurkar यांना चिरडले होते. हा हत्ती बिथरला होता. याची माहिती वॉकी-टॉकीद्वारे प्रकल्पातील सर्वच भागात दिली गेली. Indications to dismiss the scattered Gajraj elephant

मात्र कोळसा भागाचे सहायक वनसंरक्षक कुलकर्णी आणि प्रकल्पाचे मुख्य लेखापाल प्रमोद गौरकार बोटेझरी भागातून एका वाहनातून जात होते. बिथरलेल्या हत्तीची माहिती न मिळाल्याने अधिकारी बेसावध होते. हत्तीने वाहनावर चाल केली. स्वतःला वाचविताना हल्ल्यात गौरकार यांचा मृत्यू झाला. आज पहाटे मोठा फौजफाटा राबवून गजराजला नियंत्रणात आणले गेले. 

गजराजच्या अशा प्रकारच्या धुमाकुळात आजवर तिघांचा मृत्यू झालेला आहे. आता प्रधान मुख्य वन्यजीवसंरक्षकांचा सल्ला घेत हत्तीला पुनर्वसन केंद्रात पाठविले जाणार आहे. प्रकल्पातून हत्तीला कार्यमुक्त करण्याचे संकेत मिळत आहे. मयत मुख्य लेखापाल प्रमोद गौरकार यांच्या शवाचे पोस्टमोर्टम करून मूळ गावी शंकरपूर येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Edited By- Sanika Gade
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com