कोरोना बधितांना मोफत ऑक्सिजन पुरवण्यासाठी स्टील उद्योजक सरसावले 

कोरोना बधितांना मोफत ऑक्सिजन पुरवण्यासाठी स्टील उद्योजक सरसावले 
oxygen

जालना : कोरोनाबाधितांच्या  Covid 19 Patients मोफत ऑक्सिजनसाठी Free Oxygen जालन्यातील Jalna स्टील उद्योजक Steel Entrepreneur सरसावले आहेत. जालन्यातील स्टीलकडून दररोज खाजगी आणि शासकीय हॉस्पिटलमधील कोरोनाबाधित तसेच इतर उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी प्रशासनामार्फत 300  ऑक्सिजन सिलेंडर मोफत देण्यात येत आहेत.  जालन्यातील स्टील कंपन्यांनी ऑक्सिजनची कमतरता कायमची दूर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी पोलाद स्टीलने ऑक्सिजन प्लांट उभा केल्यानंतर औद्योगिक वसाहतीतील उमा स्टीलने देखील भव्य ऑक्सिजन प्लांट उभारला आहे. (Initiative by steel entrepreneurs to provide free oxygen to corona victims) 

याबाबत उमा स्टीलचे संचालक  नीलेश भारुका यांनी याबाबत माहिती दिली आहे.  हवेतील ऑक्सिजन शोषून घेणाऱ्या या प्लांटमधून दररोज 500 ऑक्सिजन सिलेंडर तयार केले जात असून 300  ऑक्सिजन सिलेंडर कोरोना बाधित तसेच ईतर उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी प्रशासनामार्फत मोफत दिले जात असल्याची माहिती उमा स्टील या कंपनीकडून देण्यात आलीय.  हा प्लांट उभा करण्यासाठी उमा स्टीलला 4  कोटी रुपयांचा खर्च आलाय. ऑक्सिजनची जिल्ह्यातील कमतरता कायमस्वरूपी दूर करण्यासाठी सर्व स्टील कंपन्यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह विभागीय आयुक्तांनी उद्योजकांना केलं होतं. 

यानंतर उमा स्टीलने अवघ्या 30  दिवसांतच  ऑक्सिजन प्लांट विकत घेऊन त्याला कार्यान्वित केलं आहे.जिल्ह्यात ऑक्सिजन अभावी रुग्णांचे हाल होऊ नये म्हणून उमा स्टीलची स्वतःची 200  सिलेंडरची दररोजची गरज पूर्ण करून उर्वरीत 300  सिलेंडर कोरोनाबाधित रुग्णांसाठी मोफत देणं सुरु केलं आहे.यांच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.जिल्हा प्रशासनाने देखील मोफत ऑक्सिजन सिलेंडर होत असल्याने उमा स्टील कंपनीचे आभार मानले आहेत.
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com