ठाण्यातील शिक्षकाचा पुढाकार, रुग्णांसाठी खाजगी गाडीतून अँब्युलन्स सुविधा

ठाण्यातील शिक्षकाचा पुढाकार, रुग्णांसाठी खाजगी गाडीतून अँब्युलन्स सुविधा
teacher

ठाणे : कोरोना संकटाने थैमान घातले असताना कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना Corona Patients अजूनही अँब्युलन्स Ambulance मिळवण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागत आहेत. जरी ॲम्बुलन्स मिळाली तरी ॲम्बुलन्स चालक अव्वाच्या सव्वा भाडे सांगून रुग्णांची लूट करत आहेत.अशा कठीण काळात ठाण्यातील एका खाजगी क्लासचा शिक्षक Teacher पुढे आला आहे. Initiative of Thane teacher

या शिक्षकाने आपल्या स्वतःच्या मालकीची खाजगी गाडी Private Vehicle कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना हॉस्पिटल Hospital पर्यंत पोचवण्यासाठी रस्त्यावर उतरवली आहे. विनय सिंग Vinay Singh असे या शिक्षकाचे नाव असून ' शिव शांति प्रतिष्ठान ' या संस्थेमार्फत रुग्णांना सेवा देण्याचे काम त्यांच्या मार्फत सुरु आहे. ठाण्यातील या शिक्षकाने आपला शिक्षकी पेशा सांभाळत सदरची सेवा विनामूल्य सुरु केल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

हे देखील पहा -

विनय सिंग याची स्वतःची गाडी 27 एप्रिल पासून कोविड रुग्णांना हॉस्पिटलमध्ये पोचवण्याचे काम करत आहे. आतापर्यंत 42 पॉझिटिव्ह रुग्णांना विनय सिंग यांनी मदत केली आहे. ही सेवा मोफत देत असून त्यासाठी गाडीमध्ये योग्य ती काळजी देखील विनय सिंग घेतात. त्यासाठी त्यांनी गाडी मध्ये विलगिकरण Isolation व्हावे म्हणून प्लास्टिक लावले आहे. Initiative of Thane teacher

विनय सिंग  स्वतः पिपीई किट घालून गाडी चालवतात, रुग्णाला सोडून आल्यावर ते गाडी सॅनिटाईझ करतात. नागरिकांचे पैसे वाचावेत व त्यांना अँब्युलन्स चा लाभ मिळावा या साठी सदरची सेवा सुरु केली असल्याचे विनय सिंग यांनी सांगितले आहे.

Edited By- Krushna Sathe 

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com