म्युकरमायकोसिसचे इंजेक्शन उपलब्धतेनुसार मोफत देणार - राजेश टोपे 

म्युकरमायकोसिसचे इंजेक्शन उपलब्धतेनुसार मोफत देणार - राजेश टोपे 
rajesh tope

जालना: म्युकर मायकोसिसला mucormycosis संसर्गजन्य आजार जाहीर करा,अशा सूचना केंद्राने राज्याला केल्या आहे. मात्र म्युकर मायकोसीस हा आजार एकापासून दुसऱ्याला होत नाही.असा रिपोर्ट Report राज्याच्या टास्क फोर्स Task Force प्रमुखांनी दिला आहे. त्यामुळे केंद्राची ही सूचना टास्क फोर्स समोर ठेऊन यावर निर्णय घेऊ अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे Rajesh Tope यांनी दिली आहे.ते जालन्यात Jalna बोलत होते. Injections of mucomycosis will be given free of cost as per availability

म्युकर मायकोसिसवर मोफत Free उपचार करण्यासाठी शासकीय आणि खाजगी दवाखाने निश्चित करण्यात आले असून यावर उपचार करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना लागू असलेले दवाखाने निश्चित करण्यात आले आहेत.शासकीय महाविद्यालयातील सर्व दवाखान्याचाही यात समावेश करण्यात आला असून रुग्णांवर होणाऱ्या खर्चापेक्षा दीड लाखांच्या रकमेपेक्षा जास्त रक्कम देण्यात येणार असून औषधी मोफत देण्यात येणार आहे.

हे देखील पहा -

एनफोटेरीसिन बी नावाचे महागडे औषध उपलब्धतेनुसार मोफत देण्यात येईल असंही टोपे यांनी म्हटलं आहे. एनफोटेरिसीन बी हे आपल्याकडे कमी उपलब्ध असून याची राज्याला अधिक प्रमाणात उपलब्धता करून घ्या अशी मागणी केंद्राकडे करण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिली.मात्र एनफोटेरिसीन उपलब्ध नसल्याने आम्ही हतबल झाल्याचं टोपे म्हणाले. या रुग्णांना ११ प्रकारच्या प्रक्रिया मोफत देणार असल्याचं टोपे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. Injections of mucomycosis will be given free of cost as per availability

सर्व प्रकारचे ग्लोबल टेंडर काढण्यात आले असून जागतिक कंपन्या यात सहभागी झाल्या असल्या तरी केंद्राने सर्व बाबी सुलभ केल्या पाहिजे अशी मागणीही टोपे यांनी केली आहे. मुंबईत कोरोना रुग्णससंख्या कमी झाली असली तरी 50 वर्षांवरील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.यावर विचारलं असता या रुग्णांची काळजी घेणं गरजेचं असून लवकरात लवकर या रुग्णांचे लसीकरण करणं गरजेचं असून या बाबतीत पूर्ण काळजी घेतली जात असल्याचे टोपे यांनी सांगितलं.

भारत सरकारच्या विज्ञान विभागाच्या त्रिसदस्यीय समितीने देशात येणाऱ्या तिसऱ्या लाटेबाबत अंदाज व्यक्त केला आहे.मात्र हा अंदाज असून तिसरी लाट कधी येईल हे आज सांगता येत नसून या समितीचा अंदाज खरा समजून राज्यात पूर्ण तयारी करून घेतली जात असल्याचे टोपे यांनी सांगितले आहे. Injections of mucomycosis will be given free of cost as per availability

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com