IPL चे सप्टेंबरमध्ये कमबॅक, बीसीसीआयची घोषणा

IPL चे सप्टेंबरमध्ये कमबॅक, बीसीसीआयची घोषणा
Saam Banner Template

सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या आयपीएल IPL २०२१च्या उर्वरित सामन्यांबाबत एक महत्त्वाची माहिती सोमर आली आहे. कोरोनाची Corona दुसरी लाट आल्याने ऐन रंगात आलेली आयपीएल स्पर्धा 4 मे रोजी स्थगित Postponed करण्यात आली होती. मात्र आता आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसंदर्भात आज महत्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये उर्वरित 31 सामने कधी आणि कुठे घ्यायचे याबाबाद चर्चा करण्यात आली. IPL comeback in September BCCI announces

आयपीएलचे स्थगित करण्यात आलेले सामने हे भारताबाहेर घेणार असल्याचं या बैठकीत निश्चित करण्यात आलं आहे.आयपीएलचा उर्वरित हंगाम आता यूएईत UAE होणार आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यात हे सामने आता यूएईत खेळण्यात येणार आहे.

भारतातील पावसाळ्याचा विचार करता बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. बीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी यासंदर्भात माहिती दिली.कोरोनामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा २९ सामन्यानंतर स्थगित करण्यात आली होती परंतु हे सामने आता यूएईत होणार आहे. १८ किंवा १९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत हे सामने यूएईत होणार असल्याची चर्चा आहे. IPL comeback in September BCCI announces

तर दुसरीकडे, बीसीसीआयनं परदेशी क्रिकेट संघटनेसोबत खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत चर्चा करणार आहे. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात खेळतील, परंतु न्यूझीलंड व इंग्लंडच्या खेळाडूंबाबत अनिश्चितता आहे अशी माहिती समोर आली आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीत इंग्लंड, न्यूझीलंड व अफगाणिस्तानचे खेळाडू राष्ट्रीय कर्तव्यावर आहे. त्यात कॅरेबियन प्रीमियर लीगच्या  पर्वाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आयपीएलच्या पहिल्या १० दिवसांत वेस्ट इंडिजच्या खेळाडूंच्या सहभागावरही आता संकट आले आहे.

Edited By - Shivani Tichkule

हे देखील पहा -

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com