कोरोनाच्या संकट काळामध्ये देखील लोकप्रतिनिधींचा बेजबाबदारपणा
MIM

कोरोनाच्या संकट काळामध्ये देखील लोकप्रतिनिधींचा बेजबाबदारपणा

धुळे : कोरोनाच्या Corona संकट काळामध्ये धुळ्याचे एमआयएम AIMIM चे आमदार MLA फारुख शाह Faruk Shah यांनी एका गार्डनच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी कार्यकर्त्यांना एकत्रित करून सोशल डिसनसिंग्जचा Social Distancing फज्जा उडवला. या वेळी त्यांनी स्वतः तोंडाला मास्क तर लावला नव्हताच मात्र कार्यक्रमामध्ये जमलेल्या कार्यकर्त्यांपैकी देखील कोणाच्या तोंडाला मास्क लावलेला दिसत नाही.

आमदार फारुख शाह यांनी कोरोनाचे सर्व नियमच Broke The Rules पायदळी तुडवल्याचे दिसून येत आहे. यामुळे धुळ्यात Dhule कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट भीती व्यक्त केली जात असून लोकप्रतिनिधींनाच कोरोनाचा विसर पडला आहे का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

 हे देखील पहा -

सध्या संपूर्ण देशासह राज्यामध्ये कोरोनाचा हाहाकार सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्यातर्फे कोरोनाला आळा घालण्यासाठी ब्रेक द चैन या मोहिमेअंतर्गत सध्या संपूर्ण राज्यामध्ये लॉकडाउन Lockdown सुरू आहे.

तर दुसरीकडे जिल्हा प्रशासनातर्फे देखील कोरोनाला आळा घालण्यासाठी जिवापाड प्रयत्न केले जात आहेत. आरोग्य यंत्रणा देखील आपल्या जीवाची बाजी लावून कोरोना बाधित रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी दिवस-रात्र एक करीत आपले कर्तव्य चोख पणे बजावत आहे.

परंतु अशा आणीबाणीच्या काळामध्ये देखील लोक प्रतिनिधींना कोरोनाचे भान राहिले आहे कि नाही असा प्रश्न आमदार फारुख शाह यांच्या हस्ते पार पडलेल्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमाकडे बघून पडल्या शिवाय राहणार नाही.

याप्रसंगी आमदार फारुख शाह यांनी स्वतः देखील तोंडाला मास्क लावलेलं दिसून येत नाहीये. व या कार्यक्रमामध्ये सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवणाऱ्या कार्यकर्त्यांनी देखील कोणीही तोंडाला मास्क लावलेला दिसत नाही. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आणखीनच वाढणार नाही का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

एकीकडे प्रशासन कोरोनाच्या तिसऱ्या लाटे पासून बचाव करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत असताना लोकप्रतिनिधींनी अशा पद्धतीने बेजबाबदारपणा दाखविल्याने पुढे येणाऱ्या कोरोनाच्या लाटांवर विजय तरी कसा मिळवणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. 
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com