त्याला बेड मिळाला नाही कारण तो छोटा राजन नव्हता : सुतापा सिकंदर
sutapa_sikander

त्याला बेड मिळाला नाही कारण तो छोटा राजन नव्हता : सुतापा सिकंदर

नवी दिल्ली: इरफानची Irrfan khan पत्नी सुतापा सिकंदर Sutapa Sikandar यांनी एक धक्कादायक बाब उघडकीस आणली आहे. तिचा नातेवाईक समीर बॅनर्जी Sameer Banargee यांना कोरोनाची लागण झालेली होती. परंतु त्यांना उपचारासाठी दिल्लीतील कोणत्याही रुग्णालयात बेड मिळू शकला नाही आणि घरी आयसीयू बसविण्यात सुद्धा त्यांना अडचणी आल्या आणि कोणतीही मदत मिळाली नाही.  Irrfan khan Wife Sutapa Sikandar spoke about Relatives Death due to covid

दिवंगत अभिनेता इरफान खानची पत्नी सुतापा सिकंदर यांनी रविवारी कोविड -१९ मुळे दिल्लीत निधन झालेल्या आपल्या नातेवाईकाच्या वाईट अवस्थेबद्दल बोलल्या. त्यांच्या सोशल मीडिया Social media हँडलवर त्या व्यक्त झाल्या आहेत. सुतापा यांनी खुलासा केला की तिचा नातेवाईक समीर बॅनर्जी यांना दिल्लीतील कोणत्याही रुग्णालयात उपचारासाठी बेड मिळू शकले नाही आणि घरी आयसीयू बसविण्यात सुद्धा अडचणी आल्या.

सिकंदर यांनी त्यांना जेवढीही मदत भेटली याबद्दल सर्वांचे आभार मानले आणि त्या म्हणाल्या की, "त्यांच्यासाठी आयसीयूमध्ये बेड मिळू शकला नाही कारण तो छोटा राजन नव्हता. तो प्रामाणिक माणूस होता." अज्ञात लोकांसाठी, अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निकलजे उर्फ ​​छोटा राजन यांनी एप्रिलमध्ये कोविड -१९ ची पॉझिटिव्ह चाचणी आली होती. आणि त्याला नवी दिल्लीस्थित अखिल भारतीय वैद्यकीय सेवा संस्थेत AIIMS दाखल केले गेले होते.

त्यांनी या नोट मध्ये लिहिले होते, 
# notanobituary # notforget

माझे नातेवाईक समीर बॅनर्जी यांच्या मदतीसाठी मी एक दिवस आधी पोस्ट केली होती. आज तो आम्हाला सोडून गेला.आमची राजधानी दिल्ली येथे घरी एक आयसीयू सुद्धा मिळू शकला नाही. आणि आम्हाला हॉस्पिटलमध्ये बेडही मिळू शकला नाही.

ज्याने आम्हाला  मदत केली त्या सर्व कोव्हिड योद्ध्यांना माझे आभार. मी जिवंत असेपर्यंत मी तुम्हा सर्वांना कधीही विसरणार नाही. मी समीरदादा चे हास्य कधीच विसरणार नाही .मी माझ्या किशोरवयीन आठवणींना त्याच्यात रुजवीन, मी कधीच विसरणार नाही की त्याच्यासाठी मला आयसीयूमध्ये बेड मिळवता आला नाही. कारण तो छोटाराजन नव्हता. तो एक प्रामाणिक माणूस होता.

दिल्लीतला हा मेहेम मी विसरणार नाही

आपण हे देखील विसरू नका की बॅनर्जी शेख दास सब अदानीय सर्वांनाच जावे लागेल. आपण हिंदू सण आणि मुस्लीम सणांवर भर देण्यापेक्षा ऑक्सिजन प्लांट्सवर अधिक लक्ष दिले नसते तर ते आपल्यासोबत काही काळ राहिले असते.  # delhigovt # modi # besttobeachotarajan # notforget

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com