सगळं अनलॉक होणार नाही हे निश्चित - आदित्य ठाकरे 

सगळं अनलॉक होणार नाही हे निश्चित - आदित्य ठाकरे 
adi

मुंबई - मुंबईतले Mumbai आकडे आटोक्यात आले आहेत अस वाटत असल तरी आम्ही ते पूर्ण कसे घटतील याकडे लक्ष देतो आहोत. अजूनही 1300 ते 1400 केसेस आहेत त्यामुळे त्या केसेस पूर्ण कमी करण्याकडे आमचं लक्ष आहे असे आदित्य ठाकरे Aditya Thackeray म्हणाले आहे. It is certain that everything will not be unlocked says Aditya Thackeray

पुढे लॉकडाऊनबद्दल Lockdown बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आताच काही सांगू शकत नाही. लोकांचे जीव वाचवणं आमच्यासाठी महत्वाचं आहे मागच्या वेळी लॉकडाऊन थोडा उगडला तेव्हा 11 हजार च्या आसपास केसेस गेल्या होत्या. त्यामुळे यावेळी काळजी घेणं गरजेचं आहे. लॉकडाऊन बद्दल आताच काही सांगू शकत नाही पण लगेचच सगळं काही उघडणार नाही हे निश्चित आहे. 

हे देखील पहा -

तर लसीकरण मोठ्या प्रमाणात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये जो समन्वय असावा लागतो तो आहे. प्रत्येक राज्याची मागणी आहे की आम्हाला जास्तीत जास्त लस द्या तशी आमचीही आहे. पण जशीजशी लस उपलब्ध होते आहे तसे लसीकरण केले जात आहे. महाराष्ट्राने आतापर्यंत सगळ्यात जास्त नागरिकांना लसी दिल्या आहेत. काही गाव तर अशी आहेत की पूर्णपणे लसीकरण झालेले आहे. संभाजीनगर परिसरात अशी दोन गावे आहेत. मुंबईत 227 लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरू आहे. ड्राईव्ह इन लसीकरण सेंटर सुद्धा सुरू आहेत. जेवढ्या लसी लवकर येतील तेवढं लसीकरण होईल असे देखील आदित्य ठाकरे म्हणाले.  It is certain that everything will not be unlocked says Aditya Thackeray

ग्लोबल टेंडरही आहे महापालिकेचे प्रयत्न सुरू आहे. भारतातल्या लसी बाहेर गेल्या नसत्या तर लसीकरण जास्त झालं असत या जर तरच्या गोष्टी आहेत. मुंबईचा पालकमंत्री म्हणून माझ्यावर मुंबईत जास्तीत जास्त लसीकरण करून घेण्याची जबाबदारी आहे असे देखील आदित्य ठाकरे म्हणाले. 

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com