मविआ सरकारातील प्रमुखांवर टिका करणे आमचा अधिकारच; आ.शहाजीबापू पाटील

मविआ सरकारातील प्रमुखांवर टिका करणे आमचा अधिकारच; आ.शहाजीबापू पाटील
Shahaji patil.jpg

सांगोला : शरद पवार Sharad Pawar हे आमच्यासाठी मार्गदर्शक असुन महाविकास आघाडी सरकारच्या Mahavikas Aghadi कुटुंबातील प्रमुख नेते आहेत. सांगोला Sangola सारख्या दुष्काळी भागासाठी सिंचन योजना प्रलंबित असताना इंदापूरसाठी Indapur उजनीतील Ujani पाणी Water नेणे योग्य नसल्याने मी तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठीच पवार साहेबांवर टिका Criticize केली होती. It is our right to criticize the heads of the Mavia government; MLA Shahajibapu Patil

हे देखील पहा -

मी राजकीय दृष्टिकोनातून टीका केली नसून घरातील माणसांवर रागावणे, टीका करणे हा आमचा अधिकारच असल्याचे सांगोल्याचे आमदार MLA शहाजीबापू Shahajibapu Patil पाटील यांनी सांगितले. इंदापूर तालुक्यातील 22 गावांंसाठी उजनीतून पाच टीएमसी पाण्याच्या निर्णयास स्थगिती मिळताच आमदार पाटील यांनी नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसुन आले आहे. 

उजनी धरणाच्या पाण्यावरून गेल्या काही दिवसांपासून सोलापूरचे Solapur राजकीय Politics वातावरण चांगलेच तापले होते. यातच शिवसेनेचे Shivsena सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी थेट शरद पवारांवर टीकास्त्र सोडत उजनीचे पाणी इंदापूरला नेल्यास सोलापूर जिल्ह्यात रक्तरंजित आंदोलन केले जाईल असा इशारा दिला होता. तसेच राज्यात ज्या ज्या वेळी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या विचाराचे सरकार आले तेव्हा त्यांनी फक्त बारामतीचा विकास केलेला आहे. It is our right to criticize the heads of the Mavia government; MLA Shahajibapu Patil

बारामतीला Baramati सगळा निधी मिळवून द्यायचा आणि बारामती हे विकास मॉडेल आहे असे देशभर सांगायचे ही पवारांची राजकीय पद्धत आहे अशीही टीका आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली होती. शरद पवारांवर केलेल्या टीकेमुळे जिल्ह्यासह राज्यात शहाजीबापू पाटील यांची चर्चा सुरू होती. मुख्यमंत्र्याच्या पक्षातीलच एका आमदाराने शरद पवारांवर टीका केल्यामुळे विरोधकांच्याही भुवया उंचावल्या होत्या. 

परंतु इंदापूरसाठी उजनीतून जाणाऱ्या पाण्याचा आदेश जलसंपदा विभागाने रद्द करताच शहाजीबापू पाटील यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. गेल्या अनेक वर्षापासून दोन टीएमसी पाण्यासाठी सांगोल्याची जनता तहानलेली असताना, येथील अनेक प्रश्न प्रलंबित असताना दुष्काळी सांगोल्यातील पाणीप्रश्नावर लक्ष देणे गरजेचे होते असेही पाटील म्हणाले. It is our right to criticize the heads of the Mavia government; MLA Shahajibapu Patil

शरद पवार खासदार असतानाच त्यांनी या प्रलंबित योजनांना प्राधान्याने निधी उपलब्ध करुन योजना पूर्ण करणे महत्त्वाचे होते. परंतु उजनीचे  पाणी इंदापूरला नेल्यामुळे तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी मी शरद पवारांवर टीका केली होती. सांगोल्याच्या हक्काच्या पाण्यासाठी मी अशी भूमिका घेतली होती.

परंतु पवार साहेब हे महाविकास आघाडीचे प्रमुख असल्याने आमच्यावर झालेल्या अन्यायासाठी टीका-टिप्पणी करणे हा माझा अधिकारच आहे. राज्यातील प्रमुख नेत्यांनी सर्वसमावेशक राजकारण करण्याची गरज असल्याचेही शेवटी आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

Edited By : Krushna Sathe
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com