१०८ वर्षांच्या आजींचा जयंत पाटील यांच्याकडून सत्कार

१०८ वर्षांच्या आजींचा जयंत पाटील यांच्याकडून सत्कार
jayant patil.jpg

सांगली - कोरोना Corona आजाराच्या कहरामुळेच भल्याभल्यांना घाम फुटला मात्र इस्लामपूर Islampur शहरातील टकलाईनगर येथील १०८ वर्षीय जरीना अब्दुल शेख यांनी कोरोनाला आपल्या जवळपास तर फिरकू दिलेच नाही उलट लसीचे दोन्ही डोस पूर्ण करून जिद्दीने लढण्याचा एक सामाजिक संदेश दिला आहे.  Jayant Patil felicitates 108 year old lady

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे NCP प्रदेशाध्यक्ष तथा सांगलीचे Sangli पालकमंत्री जयंत पाटील Jayant Patil यांनी आज दोन्ही डोस पूर्ण केल्याबद्दल १०८ वर्षीय जरीना अब्दुल शेख यांचा साडी चोळी देऊन सत्कार केला.

मंत्री जयंत पाटील यांचा आपल्या मतदारसंघातील लोकांसमवेत असलेला ऋणानुबंध हा सर्वश्रुत आहे. याच ऋणानुबंधामुळे मंत्री जयंत पाटील यांना पाहताच जरीना आजीने 'लवकर आलास...' अशी हाक देत विचारपूस केली. Jayant Patil felicitates 108 year old lady

हे देखील पहा -

आमच्या इस्लामपूर येथील जरीना आजीने लसीचे दोन्ही डोस आज पूर्ण केले आहेत. लढण्याची आणि जगण्याची जिद्द काय असते हे आज जरीना आजीने दाखवून दिलं. लसीकरण हेच कोरोनावरील प्रभावी शस्त्र आहे. त्यामुळे प्रत्येकाने लसी घ्यावी आणि कोरोनाला पराभूत करावे असे  आवाहन मंत्री जयंत पाटील यांनी केले.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com