यहुदींचा इस्लामिक भागातून निघणार मोर्चा; हमासने व्यक्त केली हिंसाचाराची शक्यता

यहुदींचा इस्लामिक भागातून निघणार मोर्चा; हमासने व्यक्त केली हिंसाचाराची शक्यता
Saam Banner Template

पॅलेस्टिनी इस्लामिक (Palestine Islamic) हमासने पुन्हा तणाव वाढण्याची भिती व्यक्त केली आहे. हमासचे (Hamas) म्हणणे आहे की मंगळवारी पूर्व जेरुसलेममध्ये (Jerusalem) इस्त्रायली ध्वज मोर्चामुळे वादाची ठिणगी पडू शकते. गाझा येथील हमासचे प्रवक्ता अब्दुलतिफ अल-कानौआ यांनी निवेदनात म्हटले आहे की ''तथाकथित ध्वज मोर्चा काढणे पॅलेस्टाईनमध्ये नवीन युद्धाला चालना देणारे ठरेल'', अशी माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे. ते म्हणाले, "जेरूसलेमच्या रस्त्यावर स्थानिकांनी आयोजित केलेल्या या फ्लॅाग मार्चमुळे पवित्र शहर आणि अल-अक्सा मशिदीच्या बचावासाठी पुन्हा लढा सुरु होईल". गाझा येथील ज्येष्ठ इस्लामिक जिहाद नेते अहमद अल-मुदलाल म्हणाले की, हा ध्वज मोर्चा जेरुसलेममधील इस्लामिक भागात घुसला तर यामुळे तेथील नागरिकांना राग येईल पॅलेस्टाईनच्या प्रदेशात विद्रोह वाढू शकतो. (Jews march out of Islamic areas; Hamas expresses possibility of violence)

इस्त्राईलमधील वृत्तानुसार आयोजकांच्या म्हणण्यानुसार हा मोर्चा मंगळवारी हनेवियम सेंट येथून सुरू होईल आणि दिमास्कस गेटच्या दिशेने जाईल. आयोजकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सहभागी ओल्ड सिटी प्रवेशद्वारावर प्रवेश करणार नाहीत तर त्याऐवजी पुढे जाऊन जाफा गेटवर प्रवेश करतील. त्यानंतर सहभागी जुन्या शहरातून जाफा गेट ते पश्चिमेच्या तटबंदीपर्यंत कूच करतील. या वार्षिक कार्यक्रमात हजारो यहुदी लोक जेरुसलेमच्या बहुसंख्य भागातून पश्चिमेकडे कूच करतात. 1967 च्या सहा दिवसांच्या युद्धादरम्यान इस्रायलने व्यापलेल्या शहराच्या पूर्वेकडील हिब्रू वर्धापन दिन म्हणून सार्वभौमत्व दर्शविण्यासाठी हे लोक हा मोर्चा काढतात.

हे देखील पाहा

गेल्या महिन्यात 10 मे रोजी सुरू झालेल्या संघर्षात इस्रायलने गाझा पट्टीतील हमासच्या ठिकांना लक्ष्य करून शेकडो हवाई हल्ले केले. त्याचवेळी हमासने इस्रायलवर चार हजाराहून अधिक रॉकेट डागले. 11 दिवस चाललेल्या संघर्षात गाझामध्ये 243 पॅलेस्टिनी लोक मारले गेले होते. तसेच  इस्राईलमध्ये 12 लोक मारले गेले होते.

Edited By : Pravin Dhamale 

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com