बेस्टच्या पाठीशी साम टीव्ही! "#BEST बचाव"

बेस्टच्या पाठीशी साम टीव्ही! "#BEST बचाव"

मुंबई : मुंबईकरांच्या हक्काची बस ही खरंतर बेस्टची ओळख. पण हीच ओळख पुसण्याचा प्रयत्न होतोय. मराठी माणसाच्या गरजेला धावणाऱ्य़ा बेस्ट बसच्या खासगीकरणाचा घाट घालण्यात आलाय, असा आरोप केला जात आहे. 

जी माणसं बेस्ट बसनं प्रवास करतात, त्याच्यांपैकीच एक असलेल्या मध्यमवर्गीय माणसांनी बेस्ट बस बिनदिक्कतपणे हाकली. पण पगार झाला नाही, म्हणून कधी प्रवाशांवर राग नाही काढला, ना कधी बेस्ट वाहतुकीवर परिणाम होऊ दिला नाही.

पण पिचलेला बेस्ट कर्मचारी किती दिवस हाल सोसणार?त्याला जगवण्याची जबाबदारी कुणाची? त्याचं घरं कसं चालणार?

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपात साम टीव्ही त्यांच्या सोबत आहे. मुंबईमध्ये बेस्ट टिकवायची असेल, तर त्यासाठी बेस्टमध्ये काम करणारा मध्यमवर्गीय बेस्ट कर्मचाऱ्याच्या मदत केलीच पाहिजे. 

मराठी माणसासाठी सामटीव्ही स्पेशल मोहिम राबवते आहे. मध्यमवर्गीय बेस्ट कर्मचाऱ्यांचे संसार वाचवण्यासाठी बेस्टच्या संपाची प्रत्येक बित्तंबातमी, बेस्ट संपाचे प्रत्येक अपडेट्स आपण घेत राहणार आहोत...  

आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी, ताठ मानेने जगण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांना आपल्या सगळ्यांची सोबत हवी आहे.. तुम्ही आहात का बेस्ट कर्मचाऱ्यांसोबत?

#BESTबचाव या हॅशटॅगसोबत सामील व्हा, सामच्या स्पेशल कॅम्पेनमध्ये!

साम टीव्ही न्यूज
बातमी... जी व्यवस्था बदलेल!

WEB TITLE : Join  saam tv special campaign with "#SAVE BEST".

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com