मुलींना लग्नाचे आमिष दाखवून पैसे उकळणाऱ्या तरुणाला जुहू पोलिसांकडून अटक

मुलींना लग्नाचे आमिष दाखवून पैसे उकळणाऱ्या तरुणाला जुहू पोलिसांकडून अटक
राजविर.jpg

वृत्तसंस्था : सोशल मिडियावर Social Media  मुलींना लग्नाचे आमिष दाखवत त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या एका आरोपीला जुहू पोलिसांनी Juhu Police  अटक केली आहे. राजवीर सिंग Rajveer singh उर्फ पुखराज गोदाराम देवासी असे या आरोपीचे नाव आहे,  तो  मूळचा राजस्थानचा रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजवीर सोशल मिडियावर मुलींना लग्नाचे आमिष दाखवत त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवत असे. त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसेही उकळत असे, आतापर्यंत राजवीरने पीडित मुलींकडून 35 लाख रुपये उकळले आहे. अशी माहीती जुहू पोलिसांनी दिली आहे.  (Juhu police arrested a youth for cheating on girls) 

आजपासून अनलाॅक...जाणून घ्या तुमचं शहर, जिल्हात काय सुरु काय बंद!
 
पीडित मुलगी आणि राजविरची ओळख देखील इन्स्टाग्रामवर झाली होती. राजविरवर गुन्हा दाखल झाल्यानंतर राजस्थानला पळून गेला होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी हानीट्रॅप लावला. पोलिसांच्या हानीट्रॅपमध्ये अडकून आरोपी मुंबईत आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपीने मुलीला तो राजस्थानच्या एका लोकप्रतिनिधींचा जवळचा व्यक्ती असल्याचं म्हटलं होतं. आरोपीने अशा प्रकारे अनेक तरुणींची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना असून त्या अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत.

Edited By- Anuradha Dhawade 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com