अवघ्या 15 दिवसात एकाच कुटुंबातील चौघांचा कोरोनाने मृत्यू...
Sangli11

अवघ्या 15 दिवसात एकाच कुटुंबातील चौघांचा कोरोनाने मृत्यू...


सांगली : सांगली Sangli जिल्ह्यातील कडेगाव Kadegaon तालुक्यातील तोंडोली येथे अवघ्या १५ दिवसात एकाच Same  कुटुंबातील Family चौघांचा कोरोनाने Corona मृत्यू Death झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर नुकतेच शिराळा येथील शिरशी येथील कुटुंब कोरोनाने मृत्युमुखी पडल्याची घटना ताजी असताना आणखी एक कुटुंब संपल्याने जिल्ह्यात District भीतीचे वातावरण Atmosphere of Fear निर्माण झाले आहे.

कडेगाव तालुक्यातील तोंडोली येथील अनिल सुखदेव मोहिते यांच्या आई  वैजंयंता सुखदेव मोहिते वय ७५ यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांना ३० एप्रिल रोजी कराड येथील रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

 हे देखील पहा -

दरम्यान अनिल यांचे वडील सुखदेव पांडुरंग मोहिते वय - ८० यांना कोरोनाची बाधा झाली. मात्र वयोवृद्ध असलेल्या सुखदेव यांना उपचारासाठी बेड मिळाला नाही. यामुळे त्यांचा 6 मे ला घरातच मृत्यू झाला. आई आणि वडिलांच्या  दुःखातुन सावरत असतानाच अनिल यांचा मोठा भाऊ अशोक सुखदेव मोहिते वय-५८ यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आणि कडेगाव तालुक्यातील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू असतानाच १५ मे रोजी अशोक यांचाही मृत्यू झाला.

यानंतर  सर्वांच्या सेवेसाठी धावपळ करणाऱ्या अनिल सुखदेव मोहिते वय-४७ यांनाही कोरोनाने गाठले होते. त्यांचा १६ मे रोजी विटा येथील कोविड रुग्णालयात  उपचारादरम्यान अनिल यांचा मृत्यू झाला. आता या कुटुंबात अनिल आणि अशोक मोहिते यांच्या पत्नी आणि सहा मुले असा परिवार आहे. मात्र एकापाठोपाठ आई वडील आणि त्यानंतर दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com