न्यायमूर्ती शरद बोबडे 18 नोव्हेंबरला स्विकारणार सरन्यायाधीशपदाची सूत्रे

न्यायमूर्ती शरद बोबडे 18 नोव्हेंबरला स्विकारणार सरन्यायाधीशपदाची सूत्रे

नवी दिल्ली : न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या सरन्यायाधीपदी होणाऱ्या नियुक्तीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली. आता लवकरच मराठमोळे बोबडे सरन्यायाधीपदाचा कारभार स्विकारतील. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी शरद बोबडे यांच्या नावाची शिफारस केली होती.

सरन्यायाधीश होण्याचा मान मिळणार मराठी माणसाला

शरद बोबडे 18 नोव्हेंबरला सरन्यायाधीशपदी विराजमान होतील. यापूर्वी सध्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी न्यायमूर्ती शरद बोबडे यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात यावी अशी शिफारस विधी आणि न्याय मंत्रालयाला पत्र लिहून केली होती. रंजन गोगोई यांनी 46वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली होती. ते 17 नोव्हेंबरला निवृत्त होतील. न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे हे अयोध्या प्रकरणाची सुनावणी घेणारे खंडपीठाचे दुसरे न्यायाधीश आहेत.


आता 47वे सरन्यायाधीश म्हणून शरद बोबडे सरन्यायाधीशपदाची सूत्रे स्विकारतील. बोबडे यांच्या नियुक्तीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली असून त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणूनही शरद अरविंद बोबडे यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर 2013 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.

23 एप्रिलला निवृत्ती
न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे हे गेली अनेक वर्षे विधी क्षेत्रात आहेत. ते 23 एप्रिल 2021 रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्यांची नियुक्ती सरन्यायाधीशपदी झाली तर ते सरन्यायाधीश म्हणून सुमारे 523 दिवस असणार आहेत.

बोबडे दुसरे न्यायाधीश
न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे हे अयोध्या प्रकरणाची सुनावणी घेणारे खंडपीठाचे दुसरे न्यायाधीश आहेत.


Web Title: Justice Sharad Bobde will accept the post of Chief Justice on November 18

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com