कल्याण ग्रामीण भागात लसीकरणाला येणार वेग....

कल्याण ग्रामीण भागात लसीकरणाला येणार वेग....
Kalyan will speed up vaccination in rural areas

कल्याण :  कल्याण Kalyan ग्रामीण भागात लसीकरणासाठी Vaccination एकच आरोग्य केंद्र निळजे असल्याने नागरिकांची मोठी गर्दी होत असते. मात्र या गर्दीवर मात करत कल्याण पूर्व आणि ग्रामीण भागाच्या माध्यस्थानी कल्याण डोंबिवली महापालिकेचे KDMC अपक्ष माजी नगरसेवक कुणाल पाटील Kunal Patil यांनी पाठपुरावा करून लसीकरण केंद्र द्वारली गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सुरू केलं आहे. Kalyan will speed up vaccination in rural areas

लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी शासनाकडून जनजागृती केली जात आहे. मात्र असे असताना कल्याण ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यासाठी नागरिकांची निळजे आरोग्य केंद्रात गर्दी होत असते. याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अनेक ग्रामीण जनताही लसीकरणापासून वंचित होती. 

यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी पुढाकार घेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या २७ गावात, त्याच प्रमाणे मलंग गड परिसरातील नागरिकांना सोयीस्कर व्हावे यादृष्टीने कल्याण पूर्वेतील द्वारली गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत लसीकरण केंद्र सुरू केल आहे. 

हे देखील पहा - 

या केंद्राला पहिल्याच दिवशी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. ग्रामीण भागातील जनतेची लसीकरणापासून होत असलेली हेळसांड लक्षात घेता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे अपक्ष माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. त्यानंतर हे लसीकरण केंद्र सुरू केल आहे. नगरसेवक कुणाल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून नागरिकांचे मोफत लसीकरण केले जाणार असल्याची माहिती अपक्ष माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी साम टीव्हीला दिली आहे. 

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com