महाराष्ट्राची सुप्रसिद्ध वगसम्राज्ञी हरपली

महाराष्ट्राची सुप्रसिद्ध वगसम्राज्ञी हरपली
kantabai satarkar

नारायणगावच्या, जुन्या पिढीतील तमाशा कलावंत व  कला भूषण मास्टर रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर या तमाशा फडाच्या संस्थापिका कांताबाई तुकाराम खेडकर - सातारकर (वय 85) यांचे आज सायंकाळी संगमनेर येथे वृद्धपकाळाने निधन झाले. कांताबाई या मूळच्या सातारा जिल्ह्यातील असल्याने कांताबाई सातारकर या नावाने त्या परिचित होत्या. तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर (नारायणगाव) यांच्या तमाशात त्या गायिका व नृत्यांगना म्हणुन काम करत होत्या. शाहीर पोवाडा गायनात त्यांचा विशेष नावलौकिक होता. फडमालक स्व.तुकाराम खेडकर यांच्याशी त्यांचा प्रेमविवाह झाला होता. आघाडीचे फडमालक रघुवीर खेडकर हे त्यांचे पुत्र असून प्रख्यात तमाशा कलावंत मंदा, अलका व बेबी या त्यांच्या कन्या आहेत.(Kantabai Satarkar passed away)

हे देखील पाहा

कांताबाईंना महाराष्ट्रात सुप्रसिद्ध वगसम्राज्ञी म्हणून देखील ओळखले जात होते. गुजरातमधील टिंबा या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता. पुढे गुजरातमधून कांताबाईंचे आईवडील सातारल्याला स्थायिक झाले. त्यांच्या कुटुंबाला तमाशाचा कसलाही वारसा नव्हता. कांताबाईंनी आपल्या नृत्याने अनेकांवर भुरळ पडली.   

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com