#BoycottKareenaKhan ट्रेंड : करीना म्हणते 'सीतेच्या' रोलसाठी १२ कोटी द्या !

#BoycottKareenaKhan ट्रेंड : करीना म्हणते 'सीतेच्या' रोलसाठी १२ कोटी द्या !
kareena kapoor

मुंबई : बाॅलिवूड Bollywood अभिनेत्री करीना कपूर Kareena Kapoor खानला सध्या नेटिझन्सच्या मोठ्या रोशाला सामोरं जावं लागत आहे. सोशल मीडियावर Social Media सध्या #BoycottKareenaKhan असा ट्रेंड सुरू आहे. Kareena says pay Rs 12 crore for Sita's role

पहा व्हिडीओ  -

चित्रपट दिग्दर्शक अलौकिक देसाई द्वारा निर्मिल्या जाणाऱ्या व रामायणावर आधारित असणाऱ्या चित्रपटामध्ये 'सीता' Sita ची भूमिका साकारण्यासाठी करीनाने अव्वाच्या सव्वा १२ कोटी रुपयांच्या मानधनाची मागणी केली आहे. 

हि बातमी समोर येताच करीना कपूर खानवर नेटकऱ्यांनी चांगलीच आगपाखड सुरु केली आहे. सोशल मीडियावर तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल Troll करण्यात येत आहे. दोन अपत्यांची आई असलेल्या आणि घटस्फोट घेतलेला असणाऱ्या अश्या अभिनेत्रीला Actress सीता मातेचा पवित्र रोल देण्यात येऊ नये अशी मागणी काही जण करू लागले आहेत.

करिनाने आगामी सिनेमासाठी तब्बल १२ कोटी रूपयांची मागणी केली आहे. बर तिने ही मागणी सीता मातेची भूमिका साकारण्यासाठी केली आहे. अशी चर्चा शनिवारपासून रंगतेय. ही चर्चा रंगताच सोशल मिडियावर सध्या करिनाला boycott करा हे शब्द दिसू लागले आहेत. एक अभिनेत्री अशी मागणी कशी काय करू शकते हा प्रश्न सध्या प्रत्येक चाहता करीनाला आणि सिनेमाच्या निर्मात्यांना विचारतोय. 

'सीता' या चित्रपटात हिंदू Hindu अभिनेत्रीलाच सीता मातेचा रोल देण्यात यावा अशी मागणीही काही नेटकरी करू लागले आहेत. सदैव वादात असणारी कंगना राणावतला Kangana Ranuat हा रोल देण्यात यावा असा सल्ला आता काहीजण चित्रपट निर्मात्यांना देऊ लागलेत हे तर नवलंच ! 

खर तर या बाबत सिनेमाचे लेखक यांनी तर अस काहीच घडल नाही आणि अजुनही करिनाला भूमिकेसाठी विचारलचं नाही आहे अशी ही माहिती मिळत आहे. मात्र ही चर्चा रंगली आणि करिनाला नेटिझन्सचा निष्कारण रोष तर सहन करावा लागला नाहीये ना या प्रश्नाचे उत्तर चित्रपट Cinema प्रदर्शित झाल्यावरच मिळेल.

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com