हद्दीत राहून, पाकव्याप्त काश्मीरमध्ये 'हल्लाबोल' दहशतवाद्यांच्या चिंधड्या, पाक सैनिकांना कंठस्नान

हद्दीत राहून, पाकव्याप्त काश्मीरमध्ये 'हल्लाबोल' दहशतवाद्यांच्या चिंधड्या, पाक सैनिकांना कंठस्नान

"मै लड़ जाना मै लड़ जाना... है लहू मे इक चिंगारी.." या गाण्याच्या ओळी गुणगुणताच प्रत्येक भारतीच्या अंगावर निश्चित रोमांच उभा राहातो... कारण भारतीय सैन्याने थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून शेकडो दहशतवाद्यांना ठार मारलं... आणि उरीच्या भ्याड हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या 17 जवानांना शौर्यपूर्ण श्रद्धांजली वाहिली..

त्याआधीही भारतीय जवानांनी म्यानमारच्या सीमेत घुसून दहशतवादी नांग्या ठेचल्या.. पण पूर्व सीमेपेक्षा पश्चिम सीमेवरील आपल्या शेजाऱ्याचा त्रास हा पाचवीलाच पूजलेला... वारंवार धडा शिकवूनही 
कुरापती काढणं ही पाकिस्तानची नित्याचीच बाब.. त्यामुळे पुन्हा भारताने एअर स्ट्राईक करुन पाकिस्तानचे दात घशात घातले... पण सुधारेल तो पाकिस्तान कुठला..

LOCवर वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करायचं.. भारतीय चौक्यांवर गोळीबार करायचा.. निरपराध भारतीयांना टार्गेट करायचं... आणि दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यास मदत करायची.. ही पाकची दैनंदिनी ठरलेलीच.. आजही (20/10/2019) पाकिस्तानने तोच कित्ता गिरवला... कुपवाडामध्ये LOCवर भल्या सकाळीच पाकने आग ओकण्यास सुरुवात केली..


या कारवाईला भारतीय जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं.. मात्र या कारवाईत दोन जवान कामी आले.. पाकच्या आजच्या कुरापतीत भारतीय सैन्याला काहीतरी काळंबेरं आढळलं.. आणि त्यांनी या घटनेचा मागोवा काढण्यास सुरुवात केली... तेव्हा लक्षात आलं की LOCवरील पाकची कुरापत म्हणजे, पाकव्याप्त काश्मीरच्या नीलम खोऱ्यातून दहशतवाद्यांना तंगधरमार्गे भारतात घुसखोरी करण्यास
मदत करणे होय.. मग काय, भारतानेही आपली सर्व शस्त्र परजली.. उखळी तोफा तय्यार केल्या.. आर्टिलरी विभागाला तंगधर सेक्टरमध्ये तैनात केलं... अन् क्षणाचाही विलंब न लावता, दहशतवाही
लाँचपॅडना निशाणा बनवलं...

दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचण्यासाठी नेहमी सीमा ओलांडणं गरजेचं नसतं, हे सेनेने आपल्या कृतीतून पाकिस्तानला दाखवून दिलं... भारतीय सीमेतील तंगधर सेक्टरमधून बरोबर विरुद्ध दिशेला असलेल्या नीलम खोऱ्यावर आपल्या तोफा रोखल्या... अन् शेकडो बॉम्बवर्षाव करत तब्बल 4 दहशतवादी तळ उद्धवस्त केले.. भारताच्या या सडेतोड कारवाईत अगणित दहशतवाद्यांच्या चिंधड्या उडाल्या... तसंच दहशतवाद्यांना संरक्षण पुरवणाऱ्या 4 ते 5 पाकिस्तानी सैनिकांनाही यमसदनी धाडलं... भारताच्या या अनपेक्षित प्रत्युत्तराने पाकला नक्कीच अद्दल घडली असणार..  भारताच्या या कारवाईने मिर्च्या झोंबलेलं पाकिस्तान, पुन्हा LOCवर नवीन कुरापती काढू शकतं... त्यामुळे भारतीय सेनाही पाकला त्यांच्याच भाषेत धडा शिकवण्यास सर्व ताकदीनिशी सीमेवर मुस्तैद आहे...

WebTittle :: Kashmiri militants rally in Pak-occupied Kashmir


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com