केसी वेणुगोपाल यांची दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या कुटुंबीयांशी भेट

केसी वेणुगोपाल यांची दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या कुटुंबीयांशी भेट
kc venugopal

हिंगोली - काँग्रेसचे Congress नेते दिवंगत खासदार राजीव सातव Rajiv Satav यांचं काही दिवसांपूर्वी पुण्यातील Pune जहांगीर रुग्णायालात दुःखद निधन झालं. त्यानंतर सातव यांच्या घरी कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी देशभरातून विविध मान्यवर भेटी देत असताना आज अचानक दिल्लीतील Delhi काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा काँग्रेस पक्षाचे महासचिव केसी वेणू गोपाल kc venugopal  यांनी सातव यांच्या कळमनुरी Kalamnuri येथील कोहिनूर Koninoor निवास्थानी भेट दिली. KC Venugopal meets the family of late MP Rajiv Satav

बंद दाराआड तब्बल अर्धा तास केसी वेणुगोपाल आणि राजीव सातव यांच्याकुटुंबीयांसोबत चर्चा केली. दिल्लीवरून नांदेड Nanded येथे विमानाने आलेले केसी वेणुगोपाल यांचा दौरा अत्यंत गोपनीय होता. असे असल्याने या दौऱ्याचे चित्रीकरण करण्यास मनाई करण्यात आली होती.

हे देखील पहा -

सातव यांच्या कुटुंबीयांची भेट घेताना केसी वेणुगोपाल यांच्या व्यतिरिक्त इतर कुणालाही प्रवेश देण्यात आला नसल्याने सातव यांच्या कुटुंबातील सदस्या पैकी कोणाला राज्यसभेची उमेदवारी देता येईल का याची चाचपणी करण्यात आल्याचं काँग्रेस पक्षातील सूत्रांनी सांगितलं आहे. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, खासदार राहूल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे केसी वेणुगोपाल यांच्या गोपनिय दौऱ्यामुळे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष आता दिल्लीकडे लागले आहे. KC Venugopal meets the family of late MP Rajiv Satav

दरम्यान, वेणुगोपाल यांनी सातव यांच्या स्मृती स्थळी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली त्या नंतर त्यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी संवाद देखील साधला. यावेळी काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी संपत कुमार, पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, आमदार अमर राजूरकर, माजी मंत्री डी. पी. सावंत, माजी आमदार डॉ. संतोष टारफे, प्राचार्य बबन पवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, नगरसेवक अनिल नेनवाणी, नंदकिशोर तोष्णीवाल, बापुराव घोंगडे, , केशव नाईक, डॉ. सतीश पाचपुते, एस. पी. राठोड, रमेश जाधव, यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन देऊन सातव कुटुंबातील एकास राज्यसभेवर घेण्याची मागणी देखील करण्यात आली.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com