केंद्रसरकरच्या पंचायत राज, माझे सरकार पुस्तिकेत पालघरच्या सफाळे पॅटर्न’चा समावेश

केंद्रसरकरच्या पंचायत राज, माझे सरकार पुस्तिकेत पालघरच्या सफाळे पॅटर्न’चा समावेश
पालघर.jpg

पालघर : सूक्ष्म नियोजनामुळे कोरोनाच्या Covid 19  महामारीमध्ये  अनेक स्तरावर युद्धपातळीवर काम करून 'सफाळे पॅटर्न' Safale Patern  नावाने केलेल्या उपाययोजनांची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. केंद्र सरकारच्या 'पंचायत राज' पुस्तकामध्ये पालघर तालुक्यातील सफाळे उंबरपाडा या ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला आहे. 'बेस्ट प्रॅक्टिस टू फाईट covid-19' अंतर्गत राज्यातील काही ग्रामपंचायतींचा पंचायत राज, माझे सरकार या पुस्तिकेत समावेश आहे. त्यामध्ये सफाळे उंबरपाडा ग्रामपंचायत चा समावेश करण्यात आल्याची माहिती  उंबरपाडा ग्रामपंचायतीचे सरपंच  अमोद पाटील यांनी दिली आहे. (Kendrasarkar's Panchayat Raj, My Government's booklet includes 'Successful Pattern of Palghar') 

गेल्या दोन वर्षांपासून देशात कोरोनाने थैमान घातले असून विविध ग्रामपंचायतीने त्यावर केलेल्या प्रातिबंधात्मक उपाययोजनांची माहिती या पुस्तिकेत  नमूद करण्यात आली आहे. यामध्ये सफाळे उंबरपाडा ग्रामपंचायतीने राबविलेल्या सफाळे पॅटर्नचा उल्लेख करण्यात आला आहे. कोरोना काळामध्ये ग्रामपंचायतीची पदाधिकारी कार्यकारिणी, स्थानिक आरोग्य प्रशासन, पोलीस प्रशासन, पंचक्रोशीतील सामाजिक राजकीय कार्यकर्ते यांच्यामार्फत या ग्रामपंचायतीअंतर्गत विलगीकरण केंद्र उभारणे, प्रधान्यक्रमे 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रतिजन चाचणी, संसर्ग ग्रस्त व्यक्तींना मोफत औषधोपचार, प्राथमिक टप्प्यातच रुग्ण शोध मोहीम अशा अनेक मोहिमा ग्रामपंचायतीमार्फत प्राधान्याने राबविली गेल्या. या उपाययोजनांची दखल घेत सफाळे पॅटर्नला थेट पंचायत राज पुस्तकात जागा मिळाली आहे, असे सरपंच अमोद पाटील यांनी सांगितले आहे.

तर, कोरोनाचे नियोजन करण्यासाठी लागणारी आरोग्य यंत्रणा,पोलीस प्रशासन,सामाजीक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते यांनी मतभेद विसरून सामाजिक जाणिवेतून मतभेद विसरून एकत्र येत प्रयत्न केल्याने सफाळे पॅटर्न यशस्वी झाला. तसेच सफाळे पॅटर्नमध्ये विविध उपाययोजना केल्यामुळं रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवता आलं आणि केंद्र सरकारकडून या पॅटर्न ची दखल घेतली गेली.  असाच प्रयत्न देशातील इतर ग्रामपंचायतीने घेतला तर देशात हाहाकार माजवलेल्या कोरोनावर नक्कीच मात करून विजयी मिळवता येईल, असे उंबरपाडाचे ग्रामस्थ प्रशांत तरे यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com