प्रियकरासोबत शेजारीच थाटला होता, लग्नाआधी संसार... 

प्रियकरासोबत शेजारीच थाटला होता, लग्नाआधी संसार... 
Kerala woman found living secretly with lover in house next door Missing for 11 years

तिरुवनंतपुरम- केरळ Kerala येथील पल्लकड Pallakad जिल्ह्यातील अयालूर Ayalur गावात खळबळजनक प्रकार बघायला मिळाला आहे. चक्क 11 वर्षांपासून बेपत्ता असलेली 29 वर्षीय महिला सापडली आहे. विशेष म्हणजे ही महिला कुटुंबियांपासून 500 मिटर लांब असलेल्या एका खोलीमध्ये राहत होती. 2010 पासून सजिथा ही बेपत्ता Missing होती. Kerala woman found living secretly with lover in house next door Missing for 11 years

तिच्या कुटुंबियांनी हरवल्याची तक्रार पोलिसांना Police दिली होती. तपास पुढे जाऊ शकला नाही. महिला इतक्या जवळ लपून राहत असल्याचे माहितीने कुटुंबियांना जबरदस्त धक्का बसला आहे. सजिथा आणि रेहमान एकमेकांवर खूप प्रेम करत होते. रेहमानसोबत राहण्यासाठी सजिथानं आपलं घर सोडलं. रेहमानला कोणत्याही ठिकाणी घर घेणे परवडणार नव्हत. त्यामुळे, त्यांनी तेथे राहण्याचा निर्णय घेतल. सजिथा आणि रेहमान एका छोट्याशा खोलीत राहत होते. 

विशेष म्हणजे रेहमानच्या घरी आणखी चौघेजण राहत असत. पण, त्यांना सजिथा आपल्याच घरातील एका खोलीत राहत असल्याचे सुद्धा माहीत नव्हते. रेहमानचे आई-वडिल, बहीण व भाचा त्या ठिकाणी राहत होते. पण, त्यांना देखील या 11 वर्षाच्या काळात सचिथा आपल्याच बरोबर घरी राहत असल्याचा पत्ताच लागला नाही. रेहमान यासाठी रोजच खबरदारी घेत होता.  Kerala woman found living secretly with lover in house next door Missing for 11 years

रेहमानने घरच्यांना त्याच्या स्वतःच्या खोलीमध्ये येण्यास सक्त मनाई करत असत. तो बाहेर जाताना घराला कुलुप लावून जात असत. शिवाय तो जेवनही आपल्या खोलीमध्येच करत असत. अनेकवेळा तो कामाला न जाता घरीच राहत असत. कामाला जाताना त्याने घेतलेला डब्बा खोलीमध्येच सारखे सोडून जायचा. जेणेकरुन सजिथाला दुपारचं जेवन मिळावे. रात्रीच्यावेळी सजिथा खोलीबाहेर यायची आणि अंघोळ वगैरे करत असत. 

तब्बल 11 वर्ष सजिथा लपवून ठेवलं होत. अखेर रेहमान-सजिथा यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च 2021 मध्ये रेहमान बेपत्ता झाला. त्यानंतर घरच्यांनी पोलिसामध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी 7 जून या दिवशी रेहमानला पकडले. रेहमानच्या चौकशीमधून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.  Kerala woman found living secretly with lover in house next door Missing for 11 years

हे देखील पहा 

रेहमानने सजिथासोबत मागच्या 11 वर्षांपासून राहत असल्याचे कबुल केल आहे. सजिथानेही पोलिसांना आपण रेहमानसोबत राहत असल्याचं मान्य केलं आहे. जोडप्याना कोर्टासमोर Court उपस्थित करण्यात आले होते. कोर्टाने सजिथाला रेहमानसोबत राहण्यास परवानगी दिली आहे. 'इंडिया टूडे'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com