खानावले ग्रामपंचायत उचलणार नागरिकांचा कोरोना खर्च, राज्यातील पहिली ग्रामपंचायत

खानावले ग्रामपंचायत उचलणार नागरिकांचा कोरोना खर्च, राज्यातील पहिली ग्रामपंचायत
grampanchyat

खालापूर- सध्या महाराष्ट्रात Maharashtra कोरोना Corona विषाणूने थैमान घातले आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येसोबतच आता मृतांच्या आकडेवारीतही मोठ्या प्रमाणातही वाढ होत. कोरोना महामारीच्या संकटाने जनजीवन विस्कळित झाले आहे. कोरोना संसर्गं कधी, कुठे, कुणाला, कशाप्रकारे गाठुन वेठीस धरेल  हे सांगता येत नाही. वासांबे wasambe मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दी नजीकच्या खानावले Khanawale ग्रुप ग्रामपंचायतीने "माझा कुटुंब माझी जबाबदारी"अंतर्गत ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांसाठी कोरोना खर्च देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. Khanawale Gram Panchayat will pay the cost of corona positive patients

खानावले ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांची कोरोना चाचणी, रेमडेसिवीर इंजेक्शन remdesivir injection ,अॅबुलन्स Oxygen आदी खर्च करणारी रायगड Raigad जिल्ह्यातील पहिली खानावले ही ग्रामपंचायत आहे. यासाठी परिसरातील नागरिकांत कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांची कोरोना चाचणी आणि तपासणी खर्चांची पावती ग्रामपंचायतीकडे सादर करावी लागणार आहे. तसेच तो कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला हॉस्पिटलमध्ये अॅम्बुलन्सने नेण्यासाठी ग्रामपंचायतीकडून सोय केली जाणार आहे. त्याचप्रमाणे रेमडेसिवीर इंजेक्शनचा खर्चही ग्रामपंचायत करणार आहे. खानावले ग्रुप ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com