पार्किंगच्या जुन्या वादातून एका व्यासायिकाचं अपहरण करुन बेदम मारहाण

पार्किंगच्या जुन्या वादातून एका व्यासायिकाचं अपहरण करुन बेदम मारहाण
Kidnapped and beaten to death over an old parking dispute

डोंबिवली :पार्किंगच्या Parking जुन्या वादातून एका व्यासायिकाचं अपहरण करुन बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली डोंबिवलीत Dombivali घडली आहे. मानपाडा Manpada पोलीस वेळीच पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला नाहीतर व्यावसायिकाचा जीव गेला असता. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी सहा पैकी तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. आणि पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत. Kidnapped and beaten to death over an old parking dispute

डोंबिवली एमआयडीसीत MIDC रणजीत झा यांची फॅक्टरी आहे. आपला जागेवर दिवा मधील बी.आर. नगर परिसरात असलेल्या मंदिरात Temple पूजेसाठी जात असतात. काही दिवसापूर्वी शरद शेट्टे आणि रणजीत या दोघांमध्ये गाडी पार्किंगवरुन Car Parking वादविवाद Argument झाला होता. या वादाचा राग मनात धरुन शरद शेट्टे कडून रणजीत मारहाणीची धमकी Threat सुद्धा देण्यात आली होती.

हे देखिल पहा - 

शुक्रवारी सायंकाळी रणजीत झा फॅक्टरी बाहेर आले असता एक पांढऱ्या कारमधून काही तरुण उतरले आणि रणजीत यांना बेदम मारहाण Beating करत कारमध्ये कोंबलेे. हा प्रकार रणजीत यांचा मुलाने पाहिला. त्याने वडिलांना वाचविण्याचा प्रयत्न केला. तो गाडीजवळ आला असता आरोपींनी गाडी लगेच सुरु केली. वडिलांना वाचवताना झा यांचा मुलगा सुद्धा त्या कारसोबत फरफटत लांब गेला. 

या घटनेची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरिक्षक दादा हरी चौरे, पोलीस अधिकारी श्रीकृष्ण गोरे यांनी तपास त्वरित सुरु केला. अवघ्या चार तासातच पोलीस गोरे यांच्या पोलिसांच्या पथकाला आरोपींना शोधून काढण्यात यश आले. त्यांची लोकेशन पोलिसांना कळली. पोलीस जेव्हा आरोपींकडे पोहचले. त्यावेळी रणजीत झा यांची स्थिती खराब होती. बेदम मारहाण केल्याने ते अर्धमेले झाले होते. वेळेत पोलीस पोहचल्याने त्यांचा जीव वाचला.

सध्या बेदम मारहाणीत जखमी झालेले रणजीत यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आणि त्यांचा मुलगा हि जखमी झाला होता त्यामुळे त्याच्यावर हि उपचार सुरु आहेत.  या प्रकरणी पोलिसांनी शिवसेना पदाधिकारी समीर मोरे, सोबतच शरद शेट्टे आणि अन्य एक व्यक्तीस अटक केली आहे. पोलीस अन्य तीन आरोपींच्या शोधात आहेत.

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com