वादळ गेल्यावर किसान अ‍ॅप अलर्ट !

वादळ गेल्यावर किसान अ‍ॅप अलर्ट !
kisan app

बुलढाणा :  बदलत्या काळानुसार शेतकरी Farmer देखील बदलत आहे. पूर्वी शेती Farming आणि हवामानाचे Weather अंदाज शेतकरी स्वतः लावायचा. आता मात्र आधुनिक तंत्रज्ञानाने Technology हवामान तसेच शेतीविषयक सल्ल्याची माहिती ऑनलाईन Online मिळू लागली. Kisan App Alert After Storm!

शेतकऱ्यांना  आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने  हवामानाची माहिती, कृषीविषयक मार्गदर्शन व सल्ले प्राप्त व्हावेत  याकरिता कृषी विभागाने 'किसान अ‍ॅप' Kisan App सुरू केले आहे. त्याचा बऱ्याच प्रमाणात फायदा  शेतकऱ्यांना होत आहे.  परंतु गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना वादळ-वारे येऊन गेल्यानंतर अलर्ट Alert प्राप्त होत आहेत. त्यामुळे सल्ल्यांऐवजी शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण होत आहे.

हे देखील पहा -

किसान अ‍ॅपद्वारे  हवामान बदल , अतिवृष्टी, वातावरणाची स्थिती , पीकपाणी, पिकांवरील रोगराई, त्यासाठी करावयाचे नियोजन आदी माहितीचे महत्वपूर्ण संदेश दिले जातात. Kisan App Alert After Storm!

ही माहिती शेतकऱ्यांसाठी आत्यंतिक उपयुक्त ठरते; परंतु गेल्या काही दिवसांपासून या अ‍ॅपद्वारे दिले जाणारे संदेश एक -दोन दिवस उशिरा मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हे केवळ अ‍ॅप नावापुरतेच आहे कि काय? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. तसेच वादळ वारे गेल्यानंतर अलर्ट मिळाल्याचे समोर आले आहे.

किसान अ‍ॅपच्या माध्यमातून मिळणारी माहिती : 

जिल्हा परिसरातील कृषी निविष्ठा व्यापारी, विक्री केंद्रे यांची माहिती अ‍ॅपमध्ये देण्यात येते. जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांचे बाजारभाव/दर देण्यात येतात. त्यामुळे दर माहित होणे शेतकऱ्यांना सोयीस्कर होते. पिकांवर कोणत्याही रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास पीक संरक्षणाबद्दल तज्ञांच्या माध्यमातून  सल्ला व मार्गदर्शनपर माहिती देण्यात येते. Kisan App Alert After Storm!

मात्र सध्या माहिती व अपडेट वेळेत मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांत संभ्रम तयार होत आहे. हवामान स्थिती, त्यामुळे वातावरणात होणारे बदलाचे अपडेट वेळेत मिळणे आवश्यक आहे. अपडेट वेळेत मिळू लागल्यास शेतीचे आगामी  नियोजन करण्यास सोयीस्कर होईल.

बाजारभाव वेळेवर तसेच दररोज अपडेट झाल्यास माल विक्रीसाठी नेता येईल,व शेतकऱ्यांची  होणारी फसवणूक टाळता येईल. पिकांवर येणारे विविध रोग याबाबत पीक संरक्षण सल्ला वारंवार अपडेट करण्यात आला तर फायदा होईल तसेच बंदी असलेली कीटकनाशके देखील कळतील. Kisan App Alert After Storm!

सतत होणारे हवामान बदल शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असते. त्यामुळेच हवामान बदलात सतर्कता महत्त्वाची आहे. वेळोवेळी वातावरण बदलाचे संदेश मिळाल्यास पिकांची काळजी घेण्यास शेतकऱ्यांना सोयीस्कर ठरेल.

परंतु गेल्या काही दिवसांपासून या अ‍ॅपच्या माध्यमातून माहिती वेळेवर अपडेट होत नसल्याने शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत.त्यामुळे अ‍ॅप उपयुक्त असले तरी वेळेवर माहिती मिळत नसल्यास त्याची उपयुक्तता कमी होईल अशी परिस्थिती आहे. 

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com