सुजय विखे पाटलांचे आॅपरेशन इंजेक्शन...(पहा व्हिडिओ)

सुजय विखे पाटलांचे आॅपरेशन इंजेक्शन...(पहा व्हिडिओ)
Sujay Vikhe brough remdesivir injection by special Plane to Nagar

नगर - राज्यात एकीकडे रेमडिसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असताना अहमदनगरचे Ahmednagar भाजप BJP खासदार डॉ. सुजय विखे Sujay Vikhe Patil यांनी एक शक्कल लढवली. थेट दिल्लीवरून Delhi आपल्या खाजगी विमानाने Aeroplane रेमडिसिव्हिर इंजेक्शनचा मोठा साठा सुजय विखे यांनी अहमदनगरला आणला. तब्बल 10 हजार इंजेक्शन त्यांनी नगरकरांसाठी आणली असल्याची माहिती देण्यात आली आहे. Large stock of injections brough by Sujay Vikhe from Delhi to Ahmednagar

महाराष्ट्रात Maharashtra आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उपद्रव झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुंगांची संख्या वाढताना दिसून येत आहे. रुग्णसंख्या वाढताच कोरोना Corona या आजाराच्या उपचारासाठी लागणाऱ्या रेमडिसिव्हिर इंजेक्शनचा Vaccine तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे.

सुजय विखे यांनी सोशल मीडियावर Social Media व्हिडीओ Video शेअर करत त्यांनी याबाबतची माहिती दिली. माझ्यापरीने जमेल ती मदत अहमदनगर जिल्ह्याला करण्याचा प्रयत्न मी करत आहे. तरुण मुलं आज तडफडत आहेत. त्यामुळे यामध्ये राजकारण आणू नका. ज्यांनी मला खासदार केलं, निवडून दिलं, त्या लोकांसाठी मी माझ्या परीने जमेल ती मदत करत आहोत, असं सुजय विखे म्हणाले. Large stock of injections brough by Sujay Vikhe from Delhi to Ahmednagar

हा पैसा कमावण्याचा धंदा नाही. लोकप्रतिनिधी म्हणून हे करणं आमची जबाबदारी आहे आणि त्याचं मला समाधान आहे. लोकांना माझ्या डोळ्यासमोर मरताना पाहू शकत नाही, असं सुजय विखे म्हणाले. मी फॅक्टरीत गेलो , तिथे मी माझ्या मैत्री संबंधांचा वापर केला, मदत घेतली आणि ही औषधं घेतली. माझ्यावर कारवाई होईल की नाही माहिती नाही. खासगी विमानाने ही औषधं आणतोय. माझ्या मनात पाप नाही, त्यामुळे मी कारवाईला घाबरत नाही, असं सुजय विखेंनी सांगितलं.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com