2021 मधील सर्वात मोठे चंद्रग्रहण

2021 मधील सर्वात मोठे चंद्रग्रहण
lunar eclipse

नवी दिल्ली : आज बुद्धपोर्णिमा Buddha poornima आणि चंद्रग्रहण Lunar eclipse एकच दिवशी आले आहे. हा योगायोग जुळून आला आहे. आजच्या दिवशी या वर्षातील पहिले  चंद्रग्रहण Lunar eclipse दिसणार आहे. आजचे  चंद्रग्रहण पूर्ण  चंद्रग्रहण असे असणार आहे, असे मत खगोलतज्ञानी व्यक्त केले आहे.  (Largest lunar eclipse in 2021)

हे देखिल पहा - 

चंद्रग्रहणाचा वेळ -

या वर्षीचे पाहिले चंद्रग्रहण दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी सुरू होणार आहे. तसेच संध्याकाळी 7 वाजून 19 मिनिटांपर्यंत हे चंद्रग्रहण राहणार आहे. या चंद्रग्रहणाला ब्लड मून देखिल म्हंटल जाते. याचे कारण चंद्र हा लाल रंगाचा दिसतो. या वर्षातील चंद्रग्रहण हे 21 जानेवारी 2019 ला झालेल्या चंद्रग्रहणानंतरचे पहिले चंद्रग्रहण आहे. 

सूर्य, पृथ्वी आणि चंद्र जेव्हा एक सरळ रेषेत येतात तेव्हा पूर्ण चंद्रग्रहण होते. चंद्रग्रहण सुरू झाल्यास पहिले चंद्र काळ्या रंगाचा दिसतो, त्यानंतर हळुहळु चंद्र पूर्ण लाल दिसण्यास सुरुवात होते. त्याला ' ब्लड मून' म्हणून ओळखले जाते. असे तेव्हाच घडते जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सावलीत येतो. तसेच आकाशात लाल रंगाचा प्रकाश दिसतो.  संपर्ण जगभरत आजचे चंद्रग्रहण अनेक ठिकाणाहुन दिसणार आहे. 

कोणत्या भागात दिसणार चंद्रग्रहण -

या वर्षीचे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. हे चंद्रग्रहण आग्नेय आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, प्रशांत महासागर, अटलांटिक, हिंद महासागर आणि अंटार्क्टिकामध्ये दिसणार आहे. जगातील अनेक शाहरांमध्ये पूर्ण चंद्रग्रहण दिसणार आहे. यात होनोलूलू, ह्यूस्टन, लॉस एंजिल्स, मनीला, मेलबर्न, सॅन फ्रांसिस्को, सियोल, शांघाई आणि टोक्यो या देशांचा समावेश असणार आहे.    

Edited By - Puja Bonkile 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com