पंधराव्या वित्त आयोगातुन मोठ्या गावांमध्ये शंभर खाटांचे कोविड सेंटर उभारा: रविकांत तुपकर यांची मागणी

पंधराव्या वित्त आयोगातुन मोठ्या गावांमध्ये शंभर खाटांचे कोविड सेंटर उभारा: रविकांत तुपकर यांची मागणी
ravikant tupkar

बुलढाणा : कोरोनाचा Corona प्रादुर्भाव आता ग्रामीण भागात गल्लोगल्लीत पोहोचला आहे. परंतु ग्रामीण विभागात Rural Division सुसज्ज आरोग्य यंत्रणा Health System उपलब्ध नाही. शहराच्या ठिकाणी तपासणी करायला लोक घाबरतात. ग्रामीण भागात औषधोपचाराची सोय झाल्यास कोरोनाला काही प्रमाणात प्रतिबंध घालता येऊ शकतो. त्यासाठी जिल्ह्यामधील मोठ्या गावांमध्ये ग्रामपंचायतींना शासनाने दिलेल्या पंधराव्या वित्त आयोगाच्या Fifteenth Finance Commission निधीतुन शंभर खाटांचे कोविड सेंटर उभारावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. Leader Ravikant Tupkar made the demands at a press conference on Friday

ग्रामीण नागरी भागात आरटीपीसीआरचे RTPCR रिपोर्ट वेळेवर मिळत नाहीत. व्यक्ती पॉझिटिव्ह Positive आहे की निगेटिव्ह Negative हेच कळत नाही. मग त्याच्यावर उपचार कसे करावेत हा प्रश्न खूप भयानक आहे. त्यातच तो पॉझिटिव्ह असेल तर विना औषधोपचाराचे चार ते पाच दिवस निघुन जातात. आणि प्रकृती गंभीर बनून रुग्ण दगावतो. अशी भयावह स्थिती आहे. 

कोरोनामुळे सर्वत्र भीषण परिस्थिती उद्भवली आहे. बेड, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. वेळेत ऑक्जिसन मिळत नाही म्हणून रुग्ण दगावत आहेत. त्यातच खासगी कोविड सेंटर्समध्ये Covid Center घडलेल्या दुर्घटनांमध्ये अनेक बळी गेले आहेत. हे सर्व चित्र हृदय पिळवटून टाकणार आहे. यामुळेच व्यथित होत शेतकरी, कष्टकऱ्यांसोबतच सर्वसामान्यांच्या समस्यांसाठी झटणारे रविकांत तुपकर Ravikant Tupkar यांनी प्रशासनाने काय उपाययोजना कराव्यात याविषयी पत्रपरिषदेत आपले मत मांडले. Leader Ravikant Tupkar made the demands at a press conference on Friday

यावेळी बोलताना तुपकर म्हणाले, लोक आरटीपीसीआरसाठी स्वॅब Swab देतात. मात्र, त्याचा रिपोर्टच तब्बल सहा दिवसांनी येतो. अहवाल कळेपर्यंत रुग्णाची प्रकृती बिघडते. काय करावे हे सामान्यांना सुचत नाही. संभाव्य मृत्यु टाळण्यासाठी प्रशासनाने ४८ तासांत आरटीपीसीआरचा रिपोर्ट देण्याची व्यवस्था करावी. मुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यांनी यासंदर्भात कठोर पावले उचण्याची गरज आहे. कारण हा प्रत्येकाचा जीवन, मरणाचा प्रश्न आहे.

अनेक हॉस्पिटलमध्ये कोविडच्या रुग्णांवर औषधोपचार केले जात आहे. त्या दवाखान्यांना मान्यता नाही. प्रशासनाकडे पुरेशी व्यवस्था नसल्याने अशा खासगी दवाखान्यांना कोविड सेंटरचा दर्जा द्यावा आणि तेथे रेमडेसिवीर आणि ऑक्जिसन पुरविण्याची व्यवस्था करावी. अशी मागणीही तुपकर यांनी केली. रेमडेसिवीरचा काळा बाजार सुरू आहे. पालकमंत्री, शासन आणि प्रशासनाने अशा काळा बाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असेदेखील तुपकर म्हणाले.

तहान लागल्यावर प्रशासन विहीर खोदत असल्याचा प्रकार सध्या सुरू असल्याचा आरोप करत रविकांत तुपकर पुढे म्हणाले, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना काही गोष्टी सुचविल्या आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागात मोठ्या ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगातून ५० ते १०० खाटांचे Beds कोविड सेंटर उभारण्याचा मुद्दा मांडण्यात आला. त्याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाशी चर्चा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. ग्रामीण भागात लक्षण नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाचे विलगीकरण करण्याची जबाबदारी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, कम्युनिटी हेल्थ ऑफिसरवर द्यावी, वॉर्डनिहाय लसीकरणाचे कॅम्प घेतल्यास काही प्रमाणात का होईना नियंत्रण मिळवता येईल. ग्रामीण भागात असे कोविड सेंटर निर्माण झाल्यास शहरी भागातील दवाखान्यांवरदेखील ताण पडणार नाही.

शहरातील जुने कोविड सेंटर सुरू करावेत, त्यासाठी शिकाऊ डॉक्टर, आरोग्य कर्मचारी नेमावेत. त्याचप्रमाणे बुलडाण्यातील क्रीडा सेंटरमध्येही मोठे कोविड सेंटर निर्माण करावे, अशी मागणीदेखील रविकांत तुपकर यांनी यावेळी केली. महाराष्ट्राला पुढील एक महिना लस मिळणार नाही. कारण केंद्र सरकारने लसीचा स्टॉक बुक केला आहे. महाराष्ट्रातील ॲक्टिव रुग्णसंख्येच्या तुलनेत जास्तीत जास्त लस महाराष्ट्राला उपलब्ध करून द्यावे, असेही तुपकर म्हणाले.

पत्रकारांना विमा कवच द्यावे:

पत्रकार कोविड योद्धे आहेत. आतापर्यंत १०५ पत्रकारांचा कोरोनाने बळी घेतला आहे. पत्रकारांना विमा संरक्षण मिळण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी तुपकर यांनी केली.

केंद्राने मन मोठे करावे, राज्याने उदार व्हावे: 

सध्याची वेळ राजकारण करण्याची नव्हे तर एकत्रित लढण्याची आहे. पक्ष, जात, धर्म बाजुला ठेऊन सर्वांनी ताकदीने लढावे. सरकारचे प्रशासनावर नियंत्रण राहिलेले नाही. केंद्र राज्यावर तर राज्य केंद्राकडे बोट दाखवते. आरोप, प्रत्यारोपातच वेळ घालवला जात आहे. मात्र, केंद्राने मन मोठे करावे आणि राज्य शासनाने उदारमतवादी धोरण ठेवायला हवे. केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करून प्रत्येकाचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा रविकांत तुपकर यांनी व्यक्त केली.

कोरोना आजार जीवनदायीत समाविष्ट करा:

रुग्णसंख्या वाढल्याने बेडची कमतरता पडत आहे. गोरगरीब रुग्ण खासगी दवाखान्यात महागडे औषधोपचार घेऊ शकत नाहीत. त्यासाठी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्या व्यक्तींनी खासगीत उपचार घ्यावेत. जेणेकरून शासकीय रुग्णालयात गरिबांवर उपचार होऊ शकतील. महात्मा फुले जीवनदायी योजनेत कोरोना आजाराचा समावेश केल्यास खासगी रुग्णालयांमध्येही गरीब कुटुंबीयांमधील कोरोना रुग्णांवर औषधोपचार करणे शक्य होऊ शकते, असे मतही तुपकर यांनी व्यक्त केले.

Edited By- Sanika Gade

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com