शिर्डीमध्ये शेतात पाणी भरत असताना बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला.... 

शिर्डीमध्ये शेतात पाणी भरत असताना बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला.... 
leoprad shirdi news

अहमदनगर : रात्रीच्या वेळी शेतामध्ये पाणी भरत असताना शेतकऱ्यावर बिबट्याने Leopard हल्ला केल्याने शेतकरी गंभीर जखमी झाला असून जखमी शेतकऱ्याला अहमदनगर Ahmednagar येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. Leopard attacks farmer in Shirdi

अहमदनगरच्या श्रीरामपूर Shrirampur तालुक्यातील बेलापूर खुर्द येथे पंढरीनाथ महाडिक वय ५७ हे शेतकरी रात्रीच्या वेळी शेतामध्ये पाणी भरत होते. अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर त्यांनी आरडा ओरडा केल्यानंतर परिसरातील शेतकरी घटनास्थळी दाखल झाले. 

हे देखील पहा -

त्याठिकाणी नरभक्षक बिबट्याचा थरार बेलापूर खुर्द Belapur Khurd भागातील नागरिकांना पाहायला मिळाला आहे. रात्रीच्या वेळी शेतामध्ये पाणी भरत असताना शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याने शेतकरी गंभीर जखमी झाला, असून जखमी शेतकऱ्याला अहमदनगर येथे उपचारासाठी दुसऱ्यादिवशी सकाळी दाखल करण्यात आले आहे. Leopard attacks farmer in Shirdi

जखमी शेतकऱ्याला तातडीने घरी आणले. कोरोनाच्या Corona पार्श्वभूमीवर डॉक्टर कोण उठणार नाही. यामुळे संपूर्ण रात्र त्यांनी घरीच काढली,  नंतर सकाळी उठून बेलापूर येथे प्राथमिक उपचार घेण्यासाठी अहमदनगर येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बेलापूर परिसरामध्ये याआधी अनेक शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला असून बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com