बिबट्याचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली   
leopard

बिबट्याचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली   

धुळे - साक्री Sakri तालुक्यातील पिंपळनेर Pimpernar शेणपूर परिसरामध्ये परिसरातील शेतकऱ्यांना Farmer झाडाखाली बिबट्याचा Leopard मृतदेह आढळून आला. त्यानंतर परिसरामध्ये ही बातमी पसरताच नागरिकांमध्ये भीतीचे Fear वातावरण पसरले होते. the leopard's body caused a stir in the area

या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली व माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ह्या बिबट्यास कोणी मारहाण करून किंवा विषारी औषध देऊन मारले आहे का असा संशय वन विभागाच्या अधिकाऱ्यांना असल्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांतर्फे पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना देखील पाचारण करण्यात आले होते.

हे देखील पहा -

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी या मृत बिबट्याचे शवविच्छेदन केले असता हा मृत बिबट्या मादी असून त्याचे वय पाच वर्ष असल्याचे सांगत मृत बिबट्या मादी आजारी असून अतिसारामुळे तिचा मृत्यू झाला असल्याचे शवविच्छेदना दरम्यान पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. the leopard's body caused a stir in the area

या मृत बिबट्याचा संपूर्ण पंचनामा झाल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांतर्फे या मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Edited By - Shivani Tichkule
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com