पुणे जिल्हात लसीकरण घोटाळा..... नक्की काय घोटाळा झालाय पाहूयात ..

पुणे जिल्हात लसीकरण घोटाळा..... नक्की काय घोटाळा झालाय पाहूयात ..

पुण्यात नवा घोटाळा उघडकीस आलाय लसीकरण केंद्रांना लसींचा जो पूरवठा करण्यात आला होता त्यात घोळ झाल्याच समोर आलं आहे. लस पूरवठा आणि प्रत्यक्षात झालेलं लसीकरण यांचा हिशोब जुळत नाहीयं हा हलगर्जीपणा नक्की कोणी केलाय असा प्रश्न पडलायं. लसी करण केंद्रावर तब्बल ४४ हजार ९४४ लसींचा हिशोब लागत नाहीय एवढ्या लसी गेल्या कुठं असा प्रश्न पुणे जिल्हा प्रशासनाला पडला आहे. पुणे जिल्हात पुणे,पिंपरी-चिंचवड मिळून २०८ लसीकरण केंद्र ह्या लसीकरण केंद्रांना १६ जानेवारीला १ लाख ८ हजार ५५६ लसींचा पुरवठा करण्यात आला होता मात्र आता या लसींचा साठा संपल्याच सांगण्यात आलंय पण शासनाच्या पोर्टल वर लसींचा साठा उपलब्ध असल्याच दाखवत आहे.याची पडताळणी करण्यात आल्यावर तब्बल ४४ हजार ९४४ लसींचा हिशोब लागत नाहीसल्याने घोळ झाल्याच समोर आलंय, मात्र हा घोळ जिल्हा प्रशासनाने पडताळुन पाहिल्या वर काही खासगी लसीकरण केंद्रांनी पोर्टल वरील माहीती दिली नसल्याने लसींच्या हिशोबात गडबड झाली असल्याने हा घोळ झालाय, मात्र आता आरोग्य विभागाकडून ही चुक दुरूस्त झालीय लसीकरणात कोणताच गैरप्रकार झाल नसल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे.

पुण्यात आतापर्यंत ९० टक्क्यांहुन आधिक लाभार्थींना कोरोना लस देण्यात आली आहे. ही लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवण्यात 
पुण्याचा दुसरा क्रमांक आहे. तर दूसरीकडे लसींबाबत तक्रारी सुरूच आहे या सगळ्याची जबाबदारी आता सध्याची जिल्हा 
प्रशासनाकडे आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com