लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स: राज्यात तयार केला २४ तासात ४० किमी रस्ता

लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स: राज्यात तयार केला २४ तासात ४० किमी रस्ता
Limca Book of Record of 40 km road constructed in 24 hours in the satara

मुंबई : राज्यातील State रस्त्याबाबत अनेक तक्रारी आपण ऐकल्या आहेत. काही ठिकाणी रस्त्याची चाळण झालेली पहिली आहे. तर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, हे कोडे अजून सुटले नाही. मात्र, आज अशी एक गोष्ट घडली आहे की, चक्क लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये Limca Book of Record त्याची नोंद झाली आहे. राज्य मार्ग क्र. १४७ वर सलग २४ तास काम करुन तब्बल ३९.६९ किलोमीटर लांबीच्या एक लेन रस्त्याचे बिटुमिनस काँक्रिटीकरणाचे काम केले आहे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सने या कामगिरीची नोंद घेतली आहे. Limca Book of Record of 40 km road constructed in 24 hours in the satara

सलग २४ तास काम करून एका बाजूचा रस्ता पूर्ण करण्याचा विक्रम बनवला आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील Construction Department या प्रकल्पाचे काम करणाऱ्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी  महाराष्ट्र Maharashtra सोबतच देशाचा मान वाढविला आहे. अशा शब्दांत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक करुन अभिनंदन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण Ashok Chavan यांनी केले आहे.

राज्य मार्ग क्र. १४७ फलटण ते म्हासुर्णे या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सातारा विभागामार्फत सध्या सातारा जिल्ह्यामध्ये प्रगतीपथावर आहे.

हे देखील पहा -

रविवार, ३० मे २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपासून ते आज सकाळी ७ वाजेपर्यंत सलग २४ तास काम करून तब्बल ३९.६९ किलोमीटर लांबीच्या एका लेनचे बिटुमिनस काँक्रिट रस्त्याचे काम पूर्ण केले आहे. या २४ तासांत सुमारे ४० किलोमीटरचा एका बाजूचा रस्ता पूर्ण करण्याचा हा एक विक्रम आहे.

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com